शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

लाखो प्रवाशांना दिलासा; अकोला-अकोटदरम्यान ब्रॉडगेज लाईन कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 19:32 IST

या नवीन रेल्वे स्थानकावर उंच प्लॅटफॉर्म तसेच इतर जरुरी प्रवासी सुविधा देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देमराठवाडा, विदर्भाला मध्य प्रदेशासोबत रेल्वेने जोडण्यात यश१७५ किलोमीटरचे काम तीन टप्प्यांत

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेमध्ये अकोला ते खांडवा मीटर गेज रेल्वे लाईनचे  ब्रॉडगेज परिवर्तन करण्याचे काम अनेक वर्षापासून शिल्लक होते.  भारतीय रेल्वेच्या युनी गेज परिवर्तन संकल्पनेतून ही मीटर गेजची लाईन ब्रॉडगेजमध्ये परिवर्तित करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यापैकी अकोला ते अकोटदरम्यानची लाईन कार्यान्वित करण्यात आली आहे.

पहिला टप्प्यातील अकोला ते अकोट या  ४४ कोलोमीटर  मीटर गेज रेल्वे लाईनचे परिवर्तन  ब्रॉड गेजमध्ये करण्यात येऊन ही ४४ किलोमीटर ब्रॉड गेज लाईन रेल्वे गाडी चालविण्याकरिता अधिकृतरीत्या कार्यान्वित करण्यात आली आहे. या ४४ किलोमीटरच्या रेल्वे मार्गावर ३८ छोटे रेल्वे पूल आणि २ मोठे रेल्वे पूल या विभागात बांधण्यात आले आहेत. याशिवाय आणखी एक मोठा रेल्वे पूल बांधण्यात आला आहे़ ५ रेल्वे स्थानक नव्याने बांधण्यात आली आहेत. 

या नवीन रेल्वे स्थानकावर उंच प्लॅटफॉर्म तसेच इतर जरुरी प्रवासी सुविधा देण्यात आल्या आहेत. २२ रेल्वे गेट जे मीटर गेज दरम्यान उपलब्ध होते, त्या सर्व २२ रेल्वे गेटच्या ठिकाणी भुयारी पूल बांधण्यात आले आहेत़ ज्यामुळे प्रवाशी सुविधेत वाढ झाली आहे. या भुयारी पुलामुळे रोड प्रवास अखंडपणे सुरु ठेवता येईल. अकोला रेल्वे स्थानकावरील यार्ड रेमॉडेलिंगचे कार्य पूर्ण करण्यात आले. सध्या उपलब्ध तीन लाईन (एक  मेन लाईन आणि दोन लूप लाईन)  सोबत चौथी लूप लाईन टाकण्यात आली आहे.  

१७५ किलोमीटरचे काम तीन टप्प्यांतदक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात येणाऱ्या अकोला-खांडवा हा जवळपास १७५  किलोमीटरच्या मार्गावरील मीटर गेज लाईन ब्रॉड गेज परिवर्तन करण्यासाठी २००८-०९ मध्ये  २ हजार ६७  कोटी रुपये  मंजूर करण्यात आले असून दमरेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. जवळपास १७५  किलोमीटरचे कार्य तीन टप्प्यांत करण्यात येत आहे. यात अकोला-अकोट-४४  किलोमीटर, दुसरा टप्पा अकोट ते अमलाखूर्द हा ७७ किलोमीटरचा तर तिसरा टप्पा अमलाखूर्द-खांडवा-५४ किलोमीटरचा आहे.

मराठवाडा व विदर्भासाठी महत्वाचेअकोला ते खांडवा गेज परिवर्तनाचा भाग असलेले अकोला-अकोट ब्रॉडगेजचे कार्य पूर्ण झाल्यामुळे अकोला येथून खांडवा जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग उपलब्ध होईल. हा रेल्वे मार्ग मराठवाडा व विदर्भाला मध्यप्रदेशसोबत जोडण्यात महत्त्वाचा ठरेल़  - गजानन माल्या, महाव्यवस्थापक दमरे

टॅग्स :railwayरेल्वेNandedनांदेडtourismपर्यटनMadhya Pradeshमध्य प्रदेशMarathwadaमराठवाडाVidarbhaविदर्भ