शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला परत पाठविण्यास नकार, संतप्त जावयाने केला सासूचा गळा कापून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 20:01 IST

सासूबाईने मुलीस पाठविण्यास नकार दिल्याने जावई रिकाम्या हाताने परत गेला. पण तो पुन्हा आला अन्

नरसी फाटा : पत्नीला परत का पाठवत नाहीस, असे म्हणून जावयाने सासुरवाडीत येऊन घरासमोर बसलेल्या सासूचा खंजीरने गळा कापून निर्घृण खून केला. ही घटना नरसी येथील बजरंगनगरात ११ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. खून करणाऱ्या जावयासह अन्य एकास रामतीर्थ पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले आहे.

नरसी येथील बजरंगनगरातील वडार गल्लीत राहत असलेल्या लक्ष्मण रॅपनवाड यांची मुलगी उज्ज्वला हिचे नांदेड येथील तरोडा खु. येथे राहणारा अशोक किशन धोत्रे यांच्यासोबत लग्न झाले. मागील एक वर्षापासून पती अशोक हा सतत मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याने उज्ज्वलाची आई पारूबाई लक्ष्मण रॅपनवाड यांनी मुलीसह तिच्या दोन अपत्यांना नरसी येथे माहेरी घेऊन आली होती. पती अशोक धोत्रे हा पत्नीला नांदावयास पाठवा म्हणून घेऊन जाण्यासाठी आठ दिवसांपूर्वी नरसी येथे आला होता. पण सासू पारूबाई हिने मुलीस पाठविण्यास नकार दिल्याने रिकाम्या हाताने परत गेला. 

दरम्यान, अशोक हा ११ डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास मोटारसायकलवर दुसऱ्या एकाला सोबत घेऊन नरसीत आला. दारूच्या नशेत असलेल्या अशोकने घरासमोर अंगणात बसलेल्या सासू पारूबाई यांच्यासोबत वाद घातला. या वादात अशोकने खंजीरने पारूबाईचा गळा कापून निर्घृण खून केला. गल्लीतील काही लोकांनी घटनेची माहिती रामतीर्थ पोलिसांना देताच पोहेकाॅ अनिल रंदकवाले व संजय शिंदे हे घटनास्थळी पोहोचले. सपोनि श्रीधर जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी अशोक किशन धोत्रे व त्याच्या साथीदारास ताब्यात घेऊन अटक केली. अतिरिक्त पोलिस अधिकारी सूरज गुरव यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.

...तर त्यांनाही संपवेलअशोकने सासूचा गळा चिरून खून केल्यानंतर आरडाओरडा करत ‘कोण जवळ येते, कोण साथ देते, त्यांनाही अशाच प्रकारे संपवतो,’ असे म्हणून दहशत निर्माण केली होती. घरात पत्नी, पारूबाईची सून, हे दोघे होते. सून बाहेर येताच तिचाही अशोकने पाठलाग केला. मात्र, घराचे गेट बंद करून घेतल्याने जीव वाचला, अशी आपबीती परिसरातील महिलांनी सांगितली. मयत पारूबाई रॅपनवाड यांच्या पश्चात पती, पाच मुली, दोन मुले, असा परिवार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड