सरळ सेवेच्या ३५ हजार जागांची भरती रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:23 IST2021-09-16T04:23:57+5:302021-09-16T04:23:57+5:30
३५ हजार जागांसाठी लाखाे उमेदवारांनी अर्ज केले. अर्थात, त्यांची परीक्षा शुल्काची एकूण काेट्यवधींची रक्कम शासनाकडे जमा आहे. त्यावर व्याजही ...

सरळ सेवेच्या ३५ हजार जागांची भरती रखडली
३५ हजार जागांसाठी लाखाे उमेदवारांनी अर्ज केले. अर्थात, त्यांची परीक्षा शुल्काची एकूण काेट्यवधींची रक्कम शासनाकडे जमा आहे. त्यावर व्याजही मिळते आहे. दुसरीकडे, परीक्षा न हाेण्यामागे काेराेनाचे कारण सांगितले जात आहे. यूपीएससी, अभियांत्रिकी, वैद्यकीय, बँकिंग आदी क्षेत्रांत परीक्षा घेतल्या जात असताना स्पर्धा परीक्षानांच काेराेनाची अडचण का, असा मुद्दा उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे.
चाैकट...
पाेलीस भरतीची अद्याप प्रतीक्षाच
प्रत्येक गृहमंत्री पाेलीस शिपायाच्या १० ते १२ हजार पदांची भरती घेण्याचे सुताेवाच करतात. मात्र, प्रत्यक्षात भरती घेतली जात नाही. परीक्षा नेमक्या केव्हा हाेणार याबाबत शासनाकडून काेणतीही स्पष्टता नसल्याने सुशिक्षित बेराेजगार उमेदवार संभ्रमात आहेत. शिवाय त्यांचे स्पर्धा परीक्षेचे वयही निघून जात आहे. विधिमंडळ सभागृहात आश्वासन देऊनही ते पाळले जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भरतीच्या प्रतीक्षेतील विशाल ठाकरे या अभ्यासू उमेदवाराने ‘लाेकमत’ला ही माहिती देऊन आपली व्यथा मांडली.
चाैकट....
जिल्हा परिषद, आराेग्य विभागात सर्वाधिक जागा
* जलसंपदा विभागात कनिष्ठ स्थापत्य अभियंताच्या ५०० पदांसाठी १० जुलै २०१९ ला जाहिरात काढण्यात आली हाेती.
* जिल्हा परिषदेच्या १३ हजार ५३५ पदांसाठी २६ मार्च २०१९ ला जाहिरात काढली गेली.
* महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळाच्या ८५६ जागांसाठी १७ जुलै २०१९ ला जाहिरात काढलेली हाेती.
* पशुसंवर्धन विभागाच्या ७२९ जागांसाठी ४ मार्च, तर महाराष्ट्र पाेलीस दलातील ५ हजार २९५ पदांसाठी ३ सप्टेंबर २०१९ ला अर्ज मागितले गेले हाेते.
* त्याचप्रमाणे सार्वजनिक आराेग्य विभागाच्या ५ हजार ७७८, तर सिडकाे आणि वीज मंडळाच्या ८ हजार ५०० जागांसाठी जाहिरात काढली गेली.