मंगळवारी मिळाले १ हजार ४९६ रेमडेसिविर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:19 IST2021-04-28T04:19:06+5:302021-04-28T04:19:06+5:30
कोरोना बाधित रुग्णांसाठी रेमडेसिविर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची फरफट होत आहे. प्रशासनाकडून रेमडेसिविरचे इंजेक्शन हे संबंधित रुग्णालयाला देण्यात ...

मंगळवारी मिळाले १ हजार ४९६ रेमडेसिविर
कोरोना बाधित रुग्णांसाठी रेमडेसिविर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची फरफट होत आहे. प्रशासनाकडून रेमडेसिविरचे इंजेक्शन हे संबंधित रुग्णालयाला देण्यात येत आहे. परंतु या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांनाच ते आणण्याचा सल्ला देण्यात येत आहे. त्यामुळे इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात वाढला होता. काळाबाजार करणाऱ्या काही जणांवर नांदेडात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी विपीन ईटणकर यांनी जिल्ह्यासाठी पंधरा हजार इंजेक्शनची मागणी केली होती. आता टप्प्याटप्प्याने हे इंजेक्शन मिळत आहेत. मंगळवारी १ हजार ४९६ इंजेक्शन प्राप्त झाली होती. त्यापैकी १ हजार ३४६ इंजेक्शन रुग्णालयांना वाटप करण्यात आली आहेत. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. संकट काळात कर्तव्य बजाविणाऱ्या पोलीस, आरोग्य व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ७५ इंजेक्शन राखीव ठेवण्यात आली आहेत.