शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
3
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
4
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
5
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
6
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
7
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
8
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
9
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
10
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
11
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
12
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
13
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
14
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
15
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
16
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
17
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
18
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
19
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
20
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

बोरगडी, सिबदरा, खैरगाव, धानोऱ्यात तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:52 IST

तालुक्यातील बोरगडी, सिबदरा, खैरगाव, धानोरा आदी गावांत विहिरी, बोअरचे पाणी संपल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ वरील गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे़

हिमायतनगर : तालुक्यातील बोरगडी, सिबदरा, खैरगाव, धानोरा आदी गावांत विहिरी, बोअरचे पाणी संपल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ वरील गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे़बोरगडी गावातील नागरिक गावाच्या बाहेरील बोअरवरून डोक्यावर, बैलगाडीने पाणी रात्रंदिवस भरत आहेत़ दरवर्षीप्रमाणे हनुमान मंदिराजवळच्या विहिरीत टँकरने पाणी टाकावे व गावकऱ्यांची तहान भागवावी, अशी मागणी माजी सरपंच दगडू काईतवाड, के़बी़ शेन्नेवाड, देवन्ना शेन्नेवाड, लक्ष्मण भैरेवाड आदींनी केली़ सिबदरा येथेही पाणीटंचाई असल्याचे प्रभाकर बाचकलवाड, मारोती भद्देवाड आदींनी सांगितले़ गावात एकाही विहिरीला व बोअरला पाणी नाही़ खैरगाव ज़ व लाईनतांडा येथे तीव्र पाणीटंचाई असून अधिग्रहण केलेल्या विहिरीचे पाणी संपल्याचे विठ्ठल गुंफलवाड यांनी सांगितले़गावात पाणीटंचाई तीव्र आहे़ टँकरची मागणी केली आहे़ महिला, बालके पाण्यासाठी भटकंती करीत आहेत़ हिमायतनगरातील ४०० ते ५०० फुटांचे बोअर कोरडे पडत आहेत़ नगरपंचायतीने १५० बोअरद्वारा शहराला पाणीपुरवठा चालू होता़ आता ७० च्या आसपास बोअरला पाणी आहे़ परंतु, शहराला कायम पाणीपुरवठा व्यवस्था करावी, अशी मागणी असून ज्या वॉर्डात तीव्र पाणीटंचाई आहे तेथे टँकरची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीElectionनिवडणूकwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूक