उमरीत रमजान ईद साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:17 IST2021-05-16T04:17:00+5:302021-05-16T04:17:00+5:30
पोलीस चौकी उभारणार हणेगाव- मरखेल ठाणे येथे सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांच्या पुढाकारातून हणेगाव येथील निजामकालीन पोलीस चौकीची ...

उमरीत रमजान ईद साजरी
पोलीस चौकी उभारणार
हणेगाव- मरखेल ठाणे येथे सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांच्या पुढाकारातून हणेगाव येथील निजामकालीन पोलीस चौकीची नवीन इमारत उभारण्यात येत असून या इमारतीचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. यावेळी शंकरलिंग शिवाचार्य महाराज, पोलीस अधिकारी आदित्य लोणीकर, विवेक पडकंठवार, आदी उपस्थित होते.
महात्मा बसवेश्वर जयंती साजरी
किनवट- शहरातील महात्मा बसवेश्वर चौकात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. लिंगायत समाजाचे नेते शिवराज राघूमामा यांनी बसवेश्वराच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, संजय बिराजदार, अरुण भंडारे, सतीश बिराजदार, चंद्रकांत भंडारे, विजय महाजन, आनंद सोनटक्के, आदी उपस्थित होते.
पाझर तलावाची दुरवस्था
किनवट- किनवट तालुक्यातील झळकवाडी शिवणी या दोन गावांच्या सीमेवर तलावाची निर्मिती करण्यात आली होती. दोन डोंगरांच्या दरीत पाझर तलावाची निर्मिती झाल्याने पावसाळ्यात हा तलाव तुडुंब भरत होता. मात्र या कालव्याचे काम अपूर्ण राहिल्याने सध्या हा कालवा पूर्णपणे जमीनदोस्त झाला आहे. या कालव्याचे बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे.
रमजान ईद साजरी
वाईबाजार- वाईबाजार येथे शुक्रवारी मुस्लिम बांधवांनी प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत ईद साजरी केली. कोरोनामुळे मुस्लिम बांधवांनी यंदाची ही रमजान ईद अगदी साध्या पद्धतीने साजरी केली. त्याबद्दल सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके, पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने मुस्लिम बांधवांचे आभार मानले.
परिचारिका दिन साजरा
कंधार- ग्रामीण रुग्णालयात ‘जागतिक परिचारिका दिन’ साजरा करण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यकांत लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी परिचारिका नंदा सोनकांबळे, वाघमारे, इनामदार यांनी मनोगत व्यक्त केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. टोम्पे, डॉ. महेश पोकले, डॉ. गजानन पवार, आदी उपस्थित होते.
बसवेश्वर जयंती साजरी
तामसा - तामसा व परिसरात महात्मा बसवेश्वर यांची जयंती घरोघरी साधेपणाने साजरी करण्यात आली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत महात्मा बसवेश्वर यांची जयंती घरी राहून साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
घंटागाडी येईना
बिलोली- शहरातील गांधीनगर भागातील घनकचरा उचलण्याकडे पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत असून आठवड्यातून केवळ दोन दिवसच घंटागाडी पाठविली जात आहे. लाखो रुपये खर्च होणाऱ्या घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन कोलमडले असून, याकडे प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
नियमांची पायमल्ली
किनवट - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाऊन लावण्यात आले आहे; परंतु गोकुंदा येथील बीसीसीमध्ये कोरोना नियमांची पायमल्ली चालू असून येथे येणाऱ्या रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालय हे कोरोनाचे हॉट स्पॉट बनल्याचे दिसून येत आहे.
उगवणशक्ती प्रात्यक्षिक
धर्माबाद - तालुक्यातील रोशनगाव, चिकनाळा, सायखेड, कारेगाव, आटाळा, शिरसफोड, बाचेगाव, पांगरी, आदी गावांत सोयाबिन बियाणे उगवण शक्ती प्रात्यक्षिक राबविण्यात आले. उर्वरित गावांत प्रात्यक्षिक दाखविण्याचे काम चालू असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सुरेंद्र पवार यांनी दिली.