शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कंधार, नायगाव, मुदखेड, बिलोली तालुक्यांत पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 00:27 IST

जिल्ह्यातील नायगाव, कंधार, मुदखेड, बिलोली, हदगाव, लोहा तालुक्यांत शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस पडला़ पावसामुळे खोळंबलेल्या पेरण्यांचा मार्ग मोकळा झाला असे सांगितले जाते़ तर दुसरीकडे नेहमीप्रमाणे वीज गुल झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली़

ठळक मुद्देखोळंबलेल्या पेरण्याचा मार्ग मोकळा शेतकरी आनंदले, नेहमीप्रमाणे वीज गुल

नांदेड : जिल्ह्यातील नायगाव, कंधार, मुदखेड, बिलोली, हदगाव, लोहा तालुक्यांत शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस पडला़ पावसामुळे खोळंबलेल्या पेरण्यांचा मार्ग मोकळा झाला असे सांगितले जाते़ तर दुसरीकडे नेहमीप्रमाणे वीज गुल झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली़कंधार तालुक्यातील कंधार, बारूळ, कौठा परिसरात जोरदार पाऊस झाला़ बारुळ येथे तब्बल एक तास पाऊस पडला़ पावसामुळे नेहमीप्रमाणे वीज गुल होवून वादळी वारेही झाले़ बहाद्दरपुरा परिसरातही विजांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली़ बळीराजात आनंदाचे वातावरण पसरले़नायगाव तालुक्यातील नरसी, घुंगराळा, गडगा परिसरातही पाऊस पडल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे़ पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणीची कामे थांबवली होती़ शुक्रवारच्या पावसाने अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला़बिलोली तालुक्यातही जोरदार पाऊस पडला़ मुदखेड येथेही पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांचे चेहरे उजळले़ लोहा तालुक्यातील शेवडी बा़, माळाकोळी परिसरात जोरदार पाऊस झाला़ मुखेड येथे सायंकाळी ढग भरून आले होते़ पावसाची हजेरी काही लागली नाही़ दरम्यान, नांदेड शहरातही रिमझिम पाऊस पडला़ एकूणच पावसामुळे शेतकºयांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे़

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती