शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये ऑनलाईन लॉटरी अड्यावर धाड; १७ मशीन्स जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 15:52 IST

आॅनलाईन जुगार खेळण्यासाठी आवश्यक असलेल्या संगणक, सीपीयुची विक्री केल्या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

नांदेड : आॅनलाईन जुगार खेळण्यासाठी आवश्यक असलेल्या संगणक, सीपीयुची विक्री केल्या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या उपकरणांच्या सहाय्याने बादशहा नावाचा आॅनलाईन जुगार चालवला जात असे.

शहरातील वजिराबाद भागातील आॅनलाईन सर्व्हीस सेंटर या दुकानात विना परवाना बादशहा नावाचा गेम आॅनलाईन मटका चालवला जात होता. याद्वारे लोकांना जास्त पैशाची आमिष दाखवून लुबाडण्यात येत होते. या प्रकरणी २१ नोव्हेंबर रोजी वजिराबाद पोलिसांनी मल्टीपर्पज हायस्कूल परिसरात असलेल्या आॅनलाईन सर्व्हीस सेंटर या दुकानावर धाड टाकली. यावेळी १७ सीपीयु जप्त करण्यात आले. या सीपीयुमध्ये सॉप्टवेअरद्वारे विविध भागात आॅनलाईन लॉटरी चालवली जात होती. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक किरण पठारे यांच्या तक्रारीवरुन वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आॅनलाईन लॉटरीचा बंदोबस्त करु- जाधवशहरात सुरू असलेल्या मटका अड्डे बंद करण्यासाठी पोलिस सरसावले आहेत. मागील चार दिवसापासून अवैध धंद्यावर धाडी टाकण्यात आल्या आहेत. शहरात आॅनलाईन लॉटरी पद्धतीने जुगार चालविला जात आहे. याबाबतची तांत्रिक माहिती घेण्यात आली असून बुधवारी पोलिसांनी धाड टाकून वजिराबाद भागातील एका दुकानातून १७ आॅनलाईन मशिन जप्त केल्या आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली. या दुकानाला सील करण्यात आले आहे.  आॅनलाईन लॉटरी पद्धतीची तांत्रिक माहिती घेवून कठोर कारवाई केली जाईल, असेही पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसNandedनांदेडraidधाड