कॉफी शॉपवर धाड, पाच जोडपे पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:28 IST2020-12-05T04:28:33+5:302020-12-05T04:28:33+5:30

चौकट- जोडपे आत बाहेरून कुलूप दुसऱ्या शटरमध्ये जोडप्यांना आत प्रवेश दिल्यानंतर बाहेरून कुलूप लावून शॉपचा मुलगा निघून जात होता. ...

Raid on coffee shop, caught five couples | कॉफी शॉपवर धाड, पाच जोडपे पकडले

कॉफी शॉपवर धाड, पाच जोडपे पकडले

चौकट- जोडपे आत बाहेरून कुलूप

दुसऱ्या शटरमध्ये जोडप्यांना आत प्रवेश दिल्यानंतर बाहेरून कुलूप लावून शॉपचा मुलगा निघून जात होता. त्यानंतर दीड ते दोन तासाने फोन आल्यानंतर तो परत येऊन कुलूप उघडत होता. या ठिकाणी एका तासासाठी साधारणत: पाचशे ते सातशे रुपये आकारण्यात येत होते. यामध्ये अल्पवयीन तरुणींचाही समावेश होता.

चौकट- कारवाई सुरू असतानाच जोडपे झाले दाखल

पोलिसांकडून कॉफी शॉपवर कारवाई सुरू असतानाच एक जोडपे आले. साध्या वेशात असलेल्या पोलिसांनाच त्यांनी शॉप सुरू आहे काय, असे विचारले. पोलिसांनीही त्यांना सुरू आहे, या मध्ये असे म्हणून आतमध्ये घेतले. त्यानंतर या तरुणालाही ताब्यात घेण्यात आले.

चौकट- अश्लीलतेला प्रोत्साहन देण्याचा प्रकार

कौठा भागात यापूर्वीही कॉफी शॉप होते. त्या ठिकाणी अश्लील चाळे सुरू होते. त्यामुळे तक्रार करून ते बंद करण्यात आले. आता पुन्हा नव्याने कॉफी शॉप सुरू झाले होते. त्याची तपासणी करून कारवाईसाठी गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत असल्याचे नगरसेवक राजू काळे यांनी सांगितले.

Web Title: Raid on coffee shop, caught five couples