शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

रहाटीची जि.प.शाळा बनली डिजिटल ज्ञानरचनावादी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 01:03 IST

बारूळ केंद्रातंर्गत येणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहाटी. या शाळेची ओळख आता सर्वदूर झाली आहे. ही शाळा लोकसहभाग व ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून डिजिटल ज्ञानरचनावादी झाली.

ठळक मुद्देलोकसहभाग : ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून निधी प्राप्तशिक्षक, मुख्याध्यापकांचेही प्रयत्न आले फळाला

बारूळ : बारूळ केंद्रातंर्गत येणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहाटी. या शाळेची ओळख आता सर्वदूर झाली आहे. ही शाळा लोकसहभाग व ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून डिजिटल ज्ञानरचनावादी झाली.शाळेतील शिक्षक केंद्रे यांनी ज्ञानरचनावादी डिजिटल गुणवत्तापूर्ण साहित्य तयार करून शाळेमध्ये अध्यापनात त्याचा वापर करून विद्यार्थी गुणवत्ता वाढविलेली आहे. त्याचबरोबर या शाळेतील प्रत्येक उपक्रमाची प्रसिद्धी ते फेसबुक, व्हॉटस्अप, यूट्यूबच्या माध्यमातून पाठवितात. अशी ही डिजिटल ज्ञानरचनावाद राबविणारी शाळा. शाळेमध्ये तंबाखूमुक्त शाळा, माझी शाळा सुंदर शाळा, दप्तराविना शाळा, दिवस शिष्यवृत्तीचा, विविध जयंती-पुण्यतिथी साजरी केली जातात व शासनाचा प्रत्येक उपक्रम शाळेत राबविला जातो. या शाळेला ग्रामसंवादाच्या माध्यमातून येथील शिक्षकांनी या शाळेची ओळख परिसरात निर्माण केली आहे.या शाळेमध्ये सध्या चार शिक्षक कार्यरत असून मुख्याध्यापक एस. टी. पवळे, ए.बी. पवळे, विशाल शिंदे हे जून २०१८ पासून व केंद्रे हे गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. या शाळेत प्रोजेक्टरद्वारे विद्यार्थ्यांना डिजिटल अभ्यासक्रमाचे धडे दिले जात अहेत. विद्यार्थी स्वत: प्रोजेक्टर हाताळतात व गुणवत्तापूर्ण ज्ञानरचनावादी साहित्याद्वारे हसत -खेळत ज्ञानदानाचे कार्य या शाळेत होते. तसेच शाळेकडून विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी देशभक्तीपर, सांस्कृतिक, नाटिकांसह आदी कार्यक्रम शाळेकडून घेण्यात येतात. त्याचबरोबर आकर्षक रंगरंगोटी, स्वच्छ पिण्याचे पाणी, विविध सुविधायुक्त शाळा आहे. या शाळेच्या विकासासाठी या तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे, बारूळ बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी नंदकुमार कवठेकर, केंद्रप्रमुख येणगे हेसुद्धा प्रयत्नशील असतात.त्याचबरोबर रहाटी गावचे सरपंच, उपसरपंच, गावचे पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष त्याचबरोबर नवीन युवक मंडळी, व सर्व गावकरी शाळा विकासासाठी सदैव तयार असतात. या शाळेत मुला-मुलींसाठी शौचाालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शाळेसाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडून ८५००० हजार, लोकसहभाग ३०००० हजार, शिक्षकांनी १० हजार असे १ लाख २५ हजार शाळेसाठी खर्च करुन शाळा व परिसरांचा बदल केला आहे.

टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षणSchoolशाळा