शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

विवस्त्र करून विद्यार्थिनीचे रॅगिंग; नर्सिंग कॉलेजच्या शिक्षक, तीन विद्यार्थिनींविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 3:48 PM

Ragging of a girl student in Nanded : विद्यार्थिनीचे वडील महाविद्यालयात आले आणि त्यांनी तिचा दाखला काढून घेतला.

ठळक मुद्देमुलीने घडलेला प्रकार वडिलांना कळवला.नंतर पोलीस ठाणे गाठून मुलीने तक्रार दिली.

हदगाव / बामणी फाटा (जि. नांदेड) : ‘कपडे काढ, नाक घास, झाडू मार...’ असे म्हणून एका विद्यार्थिनीला कपडे काढण्यास भाग पाडून रॅगिंग करण्याची घटना हदगावपासून एक किलोमीटर अंतरावरील गोविंदराव पऊळ नर्सिंग कॉलेजच्या वसतिगृहात रविवारी घडली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी एका शिक्षकासह तीन विद्यार्थिनींविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, शिक्षकाला अटक केली आहे. ( Ragging of a girl student by undressing; Crime against a nursing college teacher, three female students ) 

पीडित मुलगी आठच दिवसांपूर्वी कॉलेजमध्ये दाखल झाली. ती महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहते. वरिष्ठ वर्गात असलेल्या तीन मुली मंगळवारी पीडितेच्या खोलीत गेल्या व त्यांनी पीडितेला ‘आम्ही सिनियर आहोत’, असे धमकावले. तसेच ‘कपडे काढ, नाक घास, झाडू मार... असे म्हणून तिला तसे करण्यास भाग पाडले. हे सांगण्यासाठी मुलगी शिक्षक भगीरथ शिंदे याच्याकडे गेली, तेव्हा त्यानेही तिचा विनयभंग करून, ‘तू हलक्या जातीची आहेस, तुझे शैक्षणिक नुकसान करतो’, असे म्हणून तिला धमकावल्याचा आरोप आहे. मुलीने घडलेला प्रकार वडिलांना कळवला. सकाळी तिचे वडील महाविद्यालयात आले आणि त्यांनी तिचा दाखला काढून घेतला. नंतर पोलीस ठाणे गाठून मुलीने मंगळवारी तक्रार दिली. पोलिसांनी भगीरथसह त्या तीन मुलींविरुद्ध गुन्हा नोंदवला व भगीरथला अटक केली. पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड तपास करीत आहेत. उपविभागीय अधिकारी जी. जी. रांजणकर तपास करीत आहेत.

हेही वाचा - दोन महिन्यांपूर्वी तिसरे लग्न केले, नराधम बापाने प्रोपर्टीसाठी स्वतःच्याच मुलाला संपवले

इतर विद्यार्थिनींच्या पोलीस ठाण्यात चकराही घटना कळताच बुधवारी सकाळी काही विद्यार्थिनींनी आरोपी मुलींची बाजू घेऊन पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणात सरांचा दोष नाही, त्यांना सोडा, अशीही मागणी मुलींनी केली. मात्र, पोलीस निरीक्षक गायकवाड, महिला फौजदार कदम यांनी मुलींची समजूत काढली. तुम्ही निवेदन द्या. तपासात सत्य समोर येईलच, असे त्यांनी सांगितले. दुपारी कॉलेज सुटल्यानंतर पुन्हा काही विद्यार्थिनी ठाण्यात गेल्या. मात्र, उपविभागीय अधिकारी जी. जी. रांजणकर यांनी आरोपींवरील कारवाई थांबविण्यास नकार देऊन या मुलींना परत पाठवले.

हेही वाचा - मराठवाड्याला १३९ मि.मी.अतिरिक्त पावसाचा तडाखा; १५ लाख हेक्टरवरील पिके चिखलात

कॉलेजमध्ये तसा प्रकार झाला नाही. गेल्या दहा वर्षापासून मी येथे कार्यरत आहे. पोलीस तपासामध्ये सत्य बाहेर येईल - एच.वाय. शिंदे, प्राचार्य.

नर्सिंग कॉलेजमध्ये गणपती बसविण्यात आला. त्या ठिकाणी मुलं-मुली डीजे लावून नृत्य करतात. मी या प्रकाराला विरोध केला. आम्ही मुलींना शिकविण्यासाठी कॉलेजला पाठवितो. नृत्य शिकायला नाही. माझ्या मुलीला रॅगिंगचा सामना करावा लागला म्हणून मी तिची टीसी काढली. आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे.- पीडित मुलीचे पालक 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडStudentविद्यार्थी