शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

नांदेड शहरात बसणार रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटर; महावितरण ९८ हजार वीजमीटर बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 19:20 IST

आरएफ तंत्रज्ञानामुळे मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या मीटर रीडिंंगमधील चुका आता शंभर टक्के टाळता येणार आहेत.

नांदेड : अचूक मीटर वाचन व्हावे या उद्देशाने मानवी हस्तक्षेप टाळत महावितरणने अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटर बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे़ या निर्णयाची नांदेड शहरात अंमलबजावणी सुरू झाली असून जवळपास ९८ हजार मीटर बदलून नवे मीटर बसविण्यात येणार आहेत. 

आमचे मीटर रीडिंगच घेतले नाही? अ‍ॅव्हरेज रीडिंगचे वीजबिल दिले जाते अशा प्रकारच्या तक्रारीला आता रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटरमुळे वाव राहणार नाही. कारण आरएफ मीटरमुळे मीटर रीडिंगमध्ये होणारा मानवी हस्तक्षेप आता पूर्णपणे नाहीसा होणार आहे.  

ज्याप्रमाणे रेडिओची फ्रिक्वेन्सी सेट करुन प्रसारण केले जाते, त्याप्रमाणे पंधरा ते वीस मीटरच्या परिघातील आरएफ मीटरचे रीडिंग एकाच वेळी आपोआप घेतले जाऊन तो सर्व डाटा महावितरणच्या सर्व्हरमध्ये पोहोचवला जातो व त्यानंतर सर्व बिले तयार करुन वीजग्राहकांना वितरित करण्याची प्रक्रिया सुरु केली जाते. आरएफ तंत्रज्ञानामुळे मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या मीटर रीडिंंगमधील चुका आता शंभर टक्के टाळता येणार आहेत.  वीजग्राहकाने जेवढ्या युनिटचा वापर केला आहे तेवढ्याच युनिटची आरएफ तंत्रज्ञानामुळे थेट महावितरणच्या प्रणालीमध्ये नोंद होऊन वीजग्राहकाला अचूक वीजबिल दिले जाईल. वीजग्राहकाने वीज मीटरमध्ये छेडछाड केल्यास त्याची नोंदही वीजमीटरमध्ये घेतली जाणार असल्यामुळे वीजचोरीस आळा बसणार आहे. परिणामी, वीजगळतीचे प्रमाणही कमी होणार आहे.ग्राहकांनी सहकार्य करा - वहाणेनांदेड शहरामध्ये सिंगलफेज मीटर असलेल्या ९८ हजार वीजग्राहकांचे मीटर बदलले जाणार आहेत. त्या ठिकाणी नवीन मीटर बसविण्यात येणार आहे़ ग्राहकांनी या बदलाची नोंद घेऊन वीजमीटर बदलण्यास महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष वहाणे यांनी केले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजNandedनांदेड