शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बिलोली तहसीलमध्ये वाळू लिलावावरून राडा; १० जणांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 18:26 IST

बिलोली तालुक्यातील कोळगाव, तोरणा, कुंभारगाव शेतशिवारात अवैध सापडलेल्या वाळू साठ्याचा आज तहसील कार्यालयात लिलाव झाला.

नांदेड : बिलोली तालुक्यातील कोळगाव, तोरणा, कुंभारगाव शेतशिवारात अवैध सापडलेल्या वाळू साठ्याचा आज तहसील कार्यालयात लिलाव झाला. या लिलावास काही स्वातंत्र्यसैनिक व युवक कॉंग्रेसच्या केदार पाटील सोळुंके यांनी विरोध दर्शवला. यातून त्यांनी तहसीलमध्ये गोंधळ घातला व शासकीय वाहनाची तोडफोड केली. या प्रकरणी सोळुंकेसह इतर ९ जणांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महसूल विभागाने काही दिवसांपूर्वी  कोळगाव, तोरणा, कुंभारगाव शेतशिवारात अवैध वाळू साठ्यावर धाड टाकली होती. यातून जवळपास दहा हजार ब्रासपेक्षा जास्त वाळू साठा जप्त करण्यात आला. या साठ्याचा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने आज लिलाव करण्यात आला. याच दरम्यान काही स्वातंत्र्यसैनिक व युवक कॉंग्रेसचे केदार पाटील सोळुंके यांनी या लिलावास विरोध दर्शवला. तहसीलच्या दरवाज्यास कुलूप लावून त्यांनी तेथे ठिय्या आंदोलन सुरु ठेवले. पुढे सोळुंके हे अधिक आक्रमक झाले व त्यांनी तहसील कार्यालयात गोंधळ घातला. यात आंदोलकांनी तहसीलच्या चारचाकीवर दगडफेकही केली. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतले. 

तहसील प्रशासनाची पोलिसात तक्रार याच दरम्यान तहसीलमध्ये सगरोळी पंचायत समिती गणाच्या  निवडणूकीचे काम सुरु होते. यातच हा गोंधळ सुरु झाला. या प्रकरणी तहसील प्रशासनाने गोंधळ घालणाऱ्या दहा जणांविरोधात पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली आहे. यावेळी त्यांनी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजसुद्धा पोलिसांना सादर केले. प्रशासनाच्या तक्रारी वरून केदार पाटील सोळुंके, बाळू पाटील शिंदे सह दहा जणांवर अजामीनपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी धर्माबादचे उप पोलिस अधीक्षक नुरुल हसन बिलोलीत दाखल झाले आहेत.

कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन यासोबतच तहसील मधील गोंधळ व तहसीलदारांना शिवीगाळ केल्याप्रकरणी तहसील कर्मचाऱ्यांनी आरोपींच्या अटकेची मागणी करत काम बंद आंदोलन केले.

 

टॅग्स :NandedनांदेडCrimeगुन्हाPoliceपोलिसArrestअटकagitationआंदोलन