उद्धरली कोटी कुळे, भिमा तुझ्या जन्मामुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:17 IST2021-04-15T04:17:00+5:302021-04-15T04:17:00+5:30
रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरात अनुयायांची गर्दी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज ...

उद्धरली कोटी कुळे, भिमा तुझ्या जन्मामुळे
रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरात अनुयायांची गर्दी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि हिंगोली गेट मार्ग बॅरिकेड्स लावून बंद केला होता. त्यातही पुतळा परिसरात अभिवादनासाठी मोजक्याच अनुयायांना सोडण्यात येत होते. जयंतीनिमित्ताने पुतळा परिसरात रंगरंगोटी तसेच आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. बुधवारी पहाटेपासूनच अनुयायांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत येथे अभिवादनासाठी रीघ लावली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
सुमधुर भीमगीतांनी वातावरण मुग्ध
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुका यंदा सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आल्या. त्यामुळे अनुयायांमध्ये काहीशी नाराजी होती. मात्र, बुधवारी पहाटेच फटाक्यांच्या आतषबाजीने जयंतीच्या उत्साहाला जोरदार सुरुवात झाली. शहराच्या विविध भागांतील बुद्ध विहारांवर जयंतीनिमित्ताने आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. त्याबरोबरच स्पीकरवरून भीमगीते वाजविली जात होती. शहरभरात निळे झेंडे लावलेल्या रिक्षांतूनही या गीतांचे सूर ऐकावयास कानी पडत होते.