शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हदगाव तालुक्यातील सात गावांचा प्रश्न कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:32 IST

हदगाव तालुक्यातील चाभरा, निमगाव, चोरंबा, खैरगाव, रोडगी, सोनाळा व चाभरातांडा या सात गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करण्याची प्रक्रिया रेंगाळली आहे़

पार्डी : हदगाव तालुक्यातील चाभरा, निमगाव, चोरंबा, खैरगाव, रोडगी, सोनाळा व चाभरातांडा या सात गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करण्याची प्रक्रिया रेंगाळली आहे़ १ जानेवारीपासून या गावांचा समावेश होणार होता़ मात्र, हा प्रश्न पुन्हा लांबणीवर पडला आहे़‘त्या’ सात गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करावा, अशी मागणी गेल्या १९ वर्षांपासून होती. त्यासाठी ‘सात गाव संघर्ष समिती’ स्थापन करून शासनस्तरावर लढा देवून ही गावे अर्धापूर तालुक्यात समावेश करण्याचा लढा यशस्वी झाला होता. तसेच शासनाकडून त्या गावांचा समावेश करण्याची अधिसूचनाही जारी केली होती.हदगाव तालुक्यातील ही सात गावे तालुका पातळीपासून ५५ ते ६० किलोमीटर अंतरावर होती. यामुळे शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व निराधारांचे कोणतेही काम वेळेवर होत नव्हते. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता तर अर्धापूर तालुका या सात गावांपासून केवळ ६ ते ८ किलोमीटर अंतरावर असल्याने व सर्वच व्यवहार अधार्पूरलाच होत आहेत. यामुळे अधार्पूर तालुका निर्मितीपासून ही 'सात' गावे अर्धापूूर तालुक्यात समावेश करण्यासाठी सातत्याने संघर्ष समितीने लढा दिला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले़ गावागावांत ग्रामपंचायत समोरही उपोषणे झाली़ संघर्ष समितीने लढा अधिक तीव्र केल्याने तत्कालीन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दखल घेऊन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात १२ फेब्रुवारी २०१४ ला संघर्ष समितीची बैठक घेण्यात येऊन सदर मागणी केली होती. बैठकीस पालकमंत्री डी़ पी़ सावंत, माजी आ़ माधवराव पाटील जवळगावकर, तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार व संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते. ही लढाई पुन्हा सातत्याने चालूच ठेवत विद्यमान आ़ नागेश पाटील आष्टीकर यांच्या माध्यमातून महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे ९ आॅगस्ट २०१६ रोजी बैठक घेण्यात आली.हदगाव तालुक्यातील सात गावे अर्धापूर तालुक्यात समावेश करण्याबाबत शासनाने ३१ जुलै २०१८ ला अधिसूचना जारी केली़ १ जानेवारी २०१९ पासून हदगाव तालुक्यातील चाभरा, निमगाव, चोरंबा, खैरगाव, रोडगी, सोनाळा, चाभरातांडा या गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश होणार होता. पण प्रशासकीय तांत्रिक अडचणी आल्यामुळे हा समावेश पुन्हा लांबणीवर पडल्याचे दिसत आहे.हदगाव ६० कि़मी. वर तर अर्धापूर ६ कि़ मी़ अंतरावरहदगाव तालुक्यातील सात गावांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता ५५ ते ६० किलोमीटर अंतर पार करून जावे लागत होत़ यामुळे या सात गावांतील शेतकरी , विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, व निराधार यांचे कोणतेही काम वेळेवर होत नव्हत़े़ यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता़ तर अर्धापूूर तालुका या सात गावांपासून केवळ ६ ते ८ किलोमीटर अंतरावर असल्याने नागरिकांचे सर्वच व्यवहार अर्धापूूरलाच होतात़हदगाव तालुक्यातील निमगाव, चाभरा, चोरंबा, सोनाळा, खैरगाव, रोडगी, चाभरातांडा ही सात गावे १ जानेवारी २०१९ ला अर्धापूर तालुक्यात समाविष्ट होणार होती. परंतु, मंत्रालयात महसूल विभागातील सचिवांकडे उशिरा फाईल पोहोचल्यामुळे चार आठ दिवसांचा अवधी लागणार असल्याने सात गाव संघर्ष समिती मंत्रालयात जाऊन भेट घेणार आहे, अशी माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष पंजाबराव चव्हाण व सचिव दिगंबर मोळके यांनी दिली.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई