शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयएम’ ला धक्का; नांदेड शहराध्यक्ष काँग्रेसमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 00:32 IST

एमआयएममध्ये अनेक वर्षांपासून शहराध्यक्षपद सांभाळणाऱ्या महंमद मुखीद यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला़

नांदेड : एमआयएममध्ये अनेक वर्षांपासून शहराध्यक्षपद सांभाळणाऱ्या महंमद मुखीद यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला़ मुखीद यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी दक्षिण नांदेडातील अनेक दिग्गजांनी फिल्डिंग लावली होती़ मुखीद यांच्या प्रवेशामुळे या भागात काँग्रेसची ताकद आणखी वाढणार असून विधानसभेतही त्याचा फायदा होवू शकतो़सय्यद मोईन हे जिल्हाध्यक्ष असतानापासून महमंद मुखीद हे एमआयएमच्या शहराध्यक्षपदी होते़ त्यानंतर एमआयएमच्या जिल्हाध्यक्षपदी फेरोज लाला यांची निवड करण्यात आली होती़ परंतु सुरुवातीपासूनच लाला आणि मुखीद यांच्यात खटके उडत होते़ त्यामुळे लाला यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षनेतृत्वाला मुखीद यांच्याकडील शहराध्यक्षपद काढून घेण्यात यावे असे पत्र पाठविले होते़ पक्षनेतृत्वानेही लाला यांच्या पत्रावरुन मुखीद यांच्याकडील पद काढून घेतले़ त्यामुळे नाराज झालेल्या मुखीद यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला़लाला डावपेचात कमी पडतात- मुखीदफेरोज लाला यांना राजकारणातील डावपेच माहीत नाहीत़ तुम्ही जिल्ह्याचं काम करा मी शहराचे करतो असे मी त्यांना म्हणालो होतो़ परंतु, त्यांनी काहीएक ऐकून न घेता थेट पक्षनेतृत्वाला पत्र पाठवून माझे पद काढले, असे मुखीद म्हणाले़

टॅग्स :NandedनांदेडAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाण