पाच कवितासंग्रहांचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:13 IST2021-01-01T04:13:01+5:302021-01-01T04:13:01+5:30

प्रारंभी आदिजन संस्था संचालित वामनदादा कर्डक संगीत अकादमी प्रस्तुत प्राचार्य सुरेश पाटील, प्रज्ञाचक्षू संगीतकार अनिल उमरे व संच यांचा ...

Publication of five collections of poetry | पाच कवितासंग्रहांचे प्रकाशन

पाच कवितासंग्रहांचे प्रकाशन

प्रारंभी आदिजन संस्था संचालित वामनदादा कर्डक संगीत अकादमी प्रस्तुत प्राचार्य सुरेश पाटील, प्रज्ञाचक्षू संगीतकार अनिल उमरे व संच यांचा ‘बुद्धभीमवाणी’ प्रबोधन गीतांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास साहित्य तथा बहुजन व धम्म चळवळीतील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे राज्य सरचिटणीस प्रा. डॉ. अंबादास कांबळे, सेक्युलर मूव्हमेंट नांदेडचे जिल्हा संघटक ॲड. मिलिंद सर्पे, इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन नांदेडचे जिल्हा कार्याध्यक्ष उत्तम कानिंदे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस महेंद्र नरवाडे व क्रांतिसूर्य प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष रमेश मुनेश्वर यांनी केले आहे. किनवट, माहूर तालुक्यांत कांशीरामजी यांचे डीएसफोर, बहुजन चळवळ रुजविणारे, भारतीय बौद्ध महासभेचे माजी कार्यकर्ते, १२ वर्षे बौद्ध भिक्खू म्हणून कार्य केलेले कॉस्मॉपॉलिटन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक रामजी कांबळे गुरुजी यांच्या ‘शीलगंध’, ‘निसर्ग’, ‘आतंक’, ‘विप्लव’ व ‘जीवन का चलचक्र’ या पाच कवितासंग्रहांचे प्रकाशन होणार आहे. कांबळे गुरूजींवर प्रेम करणाऱ्या त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Web Title: Publication of five collections of poetry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.