शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाला आधारभूत किंमत द्यावी; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 13:30 IST

कुटुंबियांनी शेतकऱ्याच्या शेतमालास आधारभूत किंमत मिळवून देण्याची मागणी प्राधान्याने केली.

ठळक मुद्दे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर कर्जमाफी द्यायला हवी, असे मत नोंदविले.

- विशाल सोनटक्के

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापक आर. डी. अहिरे आणि पी. एस. कापसे यांनी मराठवाड्यातील या ३२० आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील सदस्यांशी संवाद साधला. या संवादानंतर त्यांनी या शेतकरी कुटुंबानाच मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी काय करायला हवे, याबाबतच्या सूचना जाणून घेतल्या.

सिंचऩ, शेतीपूरक व्यवसायांच्या अभावामुळेच मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या

१) ७०.९३ टक्के आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी शेतकऱ्याच्या शेतमालास आधारभूत किंमत मिळवून देण्याची मागणी प्राधान्याने केली.२) ५१.५६ टक्के शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर कर्जमाफी द्यायला हवी, असे मत नोंदविले. ३) ६४.३७ टक्के शेतकरी कुटुंबीयांना सरकारने मराठवाड्यात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता वाटते. ४) ५५.६२ टक्के आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी सरकारने शेतीपूरक व्यवसायासाठी शेतकऱ्यांना तांत्रिक सहाय्य पुरवावे तसेच हा व्यवसाय सुरु करण्यासाठी सवलतीच्या रुपात मदत करावी असे वाटते. 

खाजगी सावकारीमुळे शेतकरी अडकतो कर्जाच्या विळख्यात 

५) ५५ टक्के कुटुंबियांनी आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना सरकारने विशेष शिष्यवृत्ती सुरु करावी, असे म्हटले आहे. ६) ५७.१८ टक्के शेतकरी कुटुंबियांनी सरकारने शेतकऱ्यांना खताबरोबरच             बी-बियाणे सवलतीच्या दरात द्यावे, असे सुचविले आहे.७) ६४.६ टक्के शेतकरी कुटुंबियांनी शेतकऱ्यांना अत्यल्प व्याज दरात तसेच कमी वेळेत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. 

मराठवाडयात दुष्काळ, सिंचन सुविधांअभावी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

८) ५२.५० टक्के कुटुंबियांना शेतकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही सतावत असल्याचे दिसते. या कुटुंबियांनी शेतकऱ्यांसाठी आरोग्य विमा योजना आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. ९) ४३.१२ टक्के शेतकरी कुटुंबियांनी अल्पभूधारक लहान शेतकऱ्यांसाठी शासनाने घरकुल योजना सुरु करण्याची आवश्यकता वाटते. १०) ५१.५६ टक्के शेतकरी कुटुंबियांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी सरकारने सामाजिक संस्थाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्याची गरज व्यक्त केली आहे. 

एकच पीक ठरते आहे शेतकऱ्यांसाठी घातक 

११)  ५१.५६ टक्के शेतकरी कुटुंबियांनी ग्रामीण भागाशी संबंधित तसेच शेतीविषयक असलेल्या शासनाच्या योजना गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी पुढाकार घेण्याची गरजव्यक्त केली आहे. १२) ६०.३१ टक्के कुटुंबियांना शासनाने विविध योजनांतून जास्तीत जास्त सिंचन विहिरींना मंजुरी द्यावे असे वाटते. १३) ३४.०६ टक्के कुटुंबियांनी प्रत्येक गावात दारूबंदी लागू व्हावी, अशी सूचनाही या संवादावेळी केली.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीagricultureशेतीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ