देशव्यापी संपात नांदेडमध्येही आशांचे निषेध आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:20 IST2021-05-25T04:20:39+5:302021-05-25T04:20:39+5:30

सिटू संलग्न आशा व गट प्रवर्तक फेडरेशनच्या देशव्यापी हाकेनुसार जिल्ह्यातील सर्व आशा व गट प्रवर्तक २४ मे रोजी ...

Protest agitation of hope in Nanded also across the country | देशव्यापी संपात नांदेडमध्येही आशांचे निषेध आंदोलन

देशव्यापी संपात नांदेडमध्येही आशांचे निषेध आंदोलन

सिटू संलग्न आशा व गट प्रवर्तक फेडरेशनच्या देशव्यापी हाकेनुसार जिल्ह्यातील सर्व आशा व गट प्रवर्तक २४ मे रोजी एक दिवसीय संपावर होत्या. कोविड - १९ च्या महामारीमध्ये जिवाची पर्वा न करता तुटपुंजा मानधनावर काम करणाऱ्या आशा व गट.ताई आपल्या विविध मागण्या घेऊन सतत रस्त्यावरची लढाई लढत आहेत परंतु त्यांच्या जीवन मरणाच्या प्रश्नाकडे शासनाने नेहमीच दुर्लक्ष केल्यामुळे आशा व गट प्रवर्तकांमध्ये सरकार विरूद्ध प्रचंड नाराजी आहे.

केलेल्या कामाचा मोबदला देण्यात येत नाही तसेच अनेक आशा कोविड काळात मृत्यू झाल्याने त्यांना अद्याप पन्नास लाख रूपये विमा लागू करून अर्थसहाय्य देण्यात आले नाही. अशा अनेक मागण्या प्रलंबित असल्यामुळे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्षा कॉ.उज्ज्वला पडलवार, सचिव कॉ.गंगाधर गायकवाड,कॉ. रेखा धूतडे,कॉ. द्रोपदा पाटील,कॉ. शरयू कुलकर्णी यांच्यासह अनेक आशांनी सहभाग नोंदवला.

Web Title: Protest agitation of hope in Nanded also across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.