शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
3
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
4
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
5
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
6
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
7
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
8
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
9
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
10
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
11
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
12
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
13
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
14
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
15
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
16
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
17
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
18
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
19
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
20
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!

अपूर्ण विहिरींचे प्रस्ताव अभियंत्यांच्या घरातील पोत्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:36 IST

शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हावा यासाठी शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरींसाठी तीन लाखांचे अनुदान मंजूर केले़ हदगाव तालुक्यात मागील तीन वर्षांत १ हजार ८१ पैकी ५११ विहिरी पूर्ण झाल्या असून अपूर्ण अवस्थेतील विहिरींचे प्रस्ताव निलंबित अभियंत्याच्या घरातील पोत्यात असल्याची माहिती आहे़

ठळक मुद्देहदगाव तालुक्यातील चित्र : तीन वर्षांपासून लाभार्थ्यांचे हेलपाटे

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हावा यासाठी शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरींसाठी तीन लाखांचे अनुदान मंजूर केले़ हदगाव तालुक्यात मागील तीन वर्षांत १ हजार ८१ पैकी ५११ विहिरी पूर्ण झाल्या असून अपूर्ण अवस्थेतील विहिरींचे प्रस्ताव निलंबित अभियंत्याच्या घरातील पोत्यात असल्याची माहिती आहे़ त्यामुळे नवीन १२४ विहिरींना अद्याप सुरुवात झाली नाही़शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात यासाठी शासनाने अनुदान रुपात विहीर, सिंचन योजना अंमलात आणली़ विहिरीला पाणी लागले तर शेतक-यांना खात्रीने उत्पन्न घेता येईल़ ज्यामुळे शेतकºयांची आर्थिक उन्नती होईल़ हा त्यामागचा उद्देश होता़ मात्र हदगाव तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय व ग्रामपंचायतच्या कर्मचाºयांनी या योजनेचा अक्षरश: बाजार मांडला आहे़ मागील तीन वर्षांत १ हजार ८१ पैकी ५११ विहिरी पूर्ण झाल्या़ अपूर्ण अवस्थेतील विहिरींचे प्रस्ताव निलंबित अभियंत्याच्या घरातील पोत्यात घालण्यात आले़ त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना खेटे मारावे लागत आहेत़ मनाठा येथील गयाबाई भीमराव सोनाळे व लीलाबाई सुभाष नरवाडे हे लाभार्थी मागील तीन वर्षांपासून सिंचन विहिरीसाठी तहसील कार्यालयात चकरा मारीत आहेत़ २०१५ मध्ये या लाभार्थ्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली़ मात्र त्यांचे मस्टर निघाले नाही़ अभियंता नामदेव जाधव यांनी तीन महिन्यांपूर्वी मार्र्कआऊट दिले़ नंतर ग्रामसेवकाकडे विहिरीचा प्रस्ताव अडकला़ कशीबशी ती रोजगार हमी यंत्रणेकडे पोहोचली़ तिथे दररोज हेलपाटे मारून ही मंडळी थकली़ गावातील काही लाभार्थ्यांनी यापूर्वी सिंचन विहिरीचा लाभ घेतल्याची निनावी तक्रार करण्यात आली आहे़माझ्याकडे अद्याप कोणाचीही तक्रार आली नाही. संबंधित शेतक-याला शुक्रवारी माझ्याकडे कार्यालयात पाठवा. मी बघतो-महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी, हदगाव

सिंचन विहिरीविषयी गटविकास अधिका-यांनाच बोला, कर्मचा-यांना बोलून काही फायदा नाही- संदीप कुलकर्णी, तहसीलदार, हदगाव

विहिरींचे प्रस्ताव क्षमतेपेक्षा जास्त येतात, लोकप्रतिनिधी दबाव टाकत असल्याने प्रस्ताव स्वीकारावेच लागतात- नारायण जाधव, कंत्राटी अभियंता

टॅग्स :fundsनिधीFarmerशेतकरी