लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : खा. अशोक चव्हाण यांनी सोमवारी जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे प्रशासन गतिमान करण्याची गरज असून शासनाकडून येणारा कोणत्याही विभागाचा निधी परत जाणार नाही. याची दक्षता घ्यावी अशी सूचना त्यांनी सदस्यांना केली. विशेषत: दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीचे योग्य नियोजन करावे असे निर्देशही दिले.खा. चव्हाण यांनी सोमवारी रात्री उशिरा आयटीएम येथे जिल्हा परिषदेतील विविध विकास कामासंदर्भात सदस्यांसह पदाधिकाºयांशी संवाद साधला. बैठकीस आ. अमरनाथ राजूरकर, आ. डी.पी. सावंत, आ. वसंतराव चव्हाण, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार, माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह प्रमुख पदाधिकाºयांची उपस्थिती होती.यावेळी त्यांनी विविध विभागांची कामे कशा पद्धतीने सुरू आहेत, याची माहिती घेवून सदर कामांना अधिक गती देण्यासाठी सूचना केल्या. जिल्हा परिषदेसाठी येणारा निधी लोकांच्या हितासाठी वापरला गेला पाहिजे. विशेषत: जी कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत, त्यांना प्राधान्य देऊन ती कामे मार्गी लावण्यासाठी सर्व पदाधिकाºयांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचना खा. चव्हाण यांनी केली. कोणत्याही विभागाचा निधी परत जावू नये, यासाठी नियोजन करण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने प्राधान्यक्रम ठरवावा असेही ते म्हणाले.दरम्यान, खा. चव्हाण यांनी यापूर्वी महानगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा घेवून बैठक घेतली होती. तसेच जनहितांच्या कामांना प्राध्यान्य देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसारच जिल्हा परिषदेतील कामकाजाचा आढावा घेतल्याने जिल्हा परिषदेतील रेंगाळलेल्या कामांना गती मिळेल.
दलित वस्ती योजनेचे योग्य नियोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 00:01 IST
खा. अशोक चव्हाण यांनी सोमवारी जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे प्रशासन गतिमान करण्याची गरज असून शासनाकडून येणारा कोणत्याही विभागाचा निधी परत जाणार नाही. याची दक्षता घ्यावी अशी सूचना त्यांनी सदस्यांना केली. विशेषत: दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीचे योग्य नियोजन करावे असे निर्देशही दिले.
दलित वस्ती योजनेचे योग्य नियोजन करा
ठळक मुद्देआढावा : अशोक चव्हाण यांचे निर्देश