जिल्हा परिषदेत १० जूनपर्यंत पदोन्नत्या - मुख्य कार्यकारी अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:14 IST2021-06-01T04:14:29+5:302021-06-01T04:14:29+5:30
कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पदोन्न्तीसंदर्भात विभागवार बैठका घेऊन याद्या तयार करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सोमवारी झालेल्या ...

जिल्हा परिषदेत १० जूनपर्यंत पदोन्नत्या - मुख्य कार्यकारी अधिकारी
कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पदोन्न्तीसंदर्भात विभागवार बैठका घेऊन याद्या तयार करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत खातेप्रमुखांना दिल्या आहेत.
यापूर्वी अर्थ व पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांना पदोन्नत्या देण्यात आल्या आहेत. दिनांक ७ मे २०२१ च्या शासनपरिपत्रकानुसार पदोन्नत्या दिल्या जाणार आहेत. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी प्रलंबित असलेल्या पदोन्नती विषयाकडे मुख्य कार्यकारी लक्ष घातले आहे. जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व विभागांतील पदोन्नत्या होणार आहेत. विशेषत: शिक्षण, आरोग्य व सामान्य प्रशासन विभागातील पदोन्नत्या मोठ्या प्रमाणावर आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार या पदोन्नत्या देण्यात येणार आहेत. येत्या १० जूनपर्यंत जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नत्या देण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिली.