शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

पैनगंगा नदीपात्रात दिगडी-साकूर बंधाऱ्यातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 11:23 IST

माहूरकरांची पाणी समस्या सोडविण्यासाठी नगरपंचायतने हालचाली सुरु केल्या असून, २७ मार्च रोजी पालिका तिजोरीतून ३ लाख ६० हजारांचा डीडी उर्ध्व पैनगंगा प्रकल्प आखाडा बाळापूरकडे भरणा केल्याने ३० मार्चपर्यंत दिगडी-धानोरा धरणातून आरक्षित १ दलघमी पाणी माहूरजवळील धनोडा- पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधा-यात सोडण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीक्षेत्र माहूर: माहूरकरांची पाणी समस्या सोडविण्यासाठी नगरपंचायतने हालचाली सुरु केल्या असून, २७ मार्च रोजी पालिका तिजोरीतून ३ लाख ६० हजारांचा डीडी उर्ध्व पैनगंगा प्रकल्प आखाडा बाळापूरकडे भरणा केल्याने ३० मार्चपर्यंत दिगडी-धानोरा धरणातून आरक्षित १ दलघमी पाणी माहूरजवळील धनोडा- पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधा-यात सोडण्यात येणार आहे.माहूरची पाणीपुरवठा हडसणी, रुई, कुतेमारदिडगी, अनमाळ व इतर गावांतील पाणीयोजना पैनगंगा नदीवर अवलंबून असून आजघडीला पैनगंगा कोरडीठाक झाली. पाणी समस्या सोडविण्यासाठी इसापूर धरणातून किंवा हिंगणी बंधाºयातून पैनंगगेत पाणी सोडणे नितांत गरजेचे होते. उर्ध्व पैनगंगा प्रकल्प आखाडा बाळापूरकडे भरणा करण्यासाठीची रक्कम श्री रेणुकादेवी संस्थान व ऩप़ंने संयुक्तरित्या भरणा करावी यासाठी पालिकेने रेणुकादेवी संस्थानकडे पत्रव्यवहार केला, मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. पेयजल समस्येवर मात करण्यासाठी ऩप़ंने २७ मार्च रोजी ३ लक्ष ६० हजार रुपयांचा डी़डी़ भरणा करून दिगडी बंधाºयातून पाणी सोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली, अशी माहिती नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी दिली.गेट दुरुस्तीची कामे प्रगतीपथावरपैनगंगा कोल्हापुरी बंधा-याच्या बसवलेल्या गेटला तळपत्री व अन्य वस्तूने दुरुस्ती करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. नदीपात्रात रेतीमाफियांनी अवैध रेती उपसा केल्याने मोठमोठे खड्डे पडले असून दिगडी बंधाºयातून पाणी सोडल्यानंतरही या अवैध उत्खननामुळे पाणी कोल्हापुरी बंधाºयापर्यंत पोहोचू शकणार नाही याची खात्री ऩपं़ला पटल्याने मंगळवारपासून जेसीबीच्या मदतीने नदीपात्रामधील खड्डे व्यवस्थित केले जात आहेत. ३० मार्च रोजी पाणी कोल्हापुरी बंधाºयात पोहोचल्यास माहूरची विस्कळीत पाणीपुरवठा योजना रुळावर येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :riverनदीWaterपाणीnagaradhyakshaनगराध्यक्षDamधरण