जिल्ह्यातील एक हजार रिक्षाचालकांच्या रोटीचा प्रश्न मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:17 IST2021-04-16T04:17:06+5:302021-04-16T04:17:06+5:30

प्रतिक्रिया... मागील १९ वर्षांपासून मी रिक्षा चालवत आहे. शासनाला दरवर्षी १५ हजार रुपये टॅक्स भरतो, तसेच इन्शुरन्स आणि पासिंगसाठीही ...

The problem of bread for one thousand rickshaw pullers in the district was solved | जिल्ह्यातील एक हजार रिक्षाचालकांच्या रोटीचा प्रश्न मिटला

जिल्ह्यातील एक हजार रिक्षाचालकांच्या रोटीचा प्रश्न मिटला

प्रतिक्रिया...

मागील १९ वर्षांपासून मी रिक्षा चालवत आहे. शासनाला दरवर्षी १५ हजार रुपये टॅक्स भरतो, तसेच इन्शुरन्स आणि पासिंगसाठीही पैसे जातात. शासनाने रिक्षाचालकांसाठी मदत जाहीर केली असली तरीही ती केवळ परवानाधारकांनाच मिळणार आहे. त्यामुळे इतर रिक्षाचालकांवर अन्याय होत आहे. लायसन्स बॅच असलेल्या रिक्षाचालकांनाही सरकारने अनुदान देण्याची गरज आहे.

- अहेमद बाबा, जिल्हाध्यक्ष टायगर ऑटो रिक्षा संघटना

राज्य शासनाने फूल नाही फुलाची पाकळी म्हणून परवानाधारक रिक्षाचालकांना लॉकडाऊनच्या कालावधीत दीड हजाराची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम कमी असली तरीही ज्या परिस्थितीत सरकारने अनुदान जाहीर केले आहे, ते पाहता राज्य शासनाचे कौतुक करायला हवे. मात्र परवाना नसलेल्या इतरांनाही मदत मिळायला हवी होती.

- तुकाराम शिंदे, परवानाधारक रिक्षाचालक

राज्य शासनाने रिक्षाचालकांना दिलेला आर्थिक मदतीचा हात कौतुकास्पद आहे. अनुदानाची रक्कम कमी असली तरीही कोराेना संकटात शासन आमच्या रोटीचा विचार करतो ही भावना मनाला दिलासा देणारी आहे.

-गणेश काळे, रिक्षाचालक

Web Title: The problem of bread for one thousand rickshaw pullers in the district was solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.