शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळेत भरते खाजगी शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:28 IST

येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या जुन्या इमारतीत एक खाजगी शाळेत भरते. या शाळेचे भाडेपत्रक नसल्याचे पंचायत समितीचा शिक्षण विभाग सांगते तर ५५ वर्षांचे भाडेपत्रक असल्याचे खाजगी शाळेचे मुख्याध्यापक सांगतात यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देशाळेचा वाद मंत्रालयापर्यंत, खाजगी शाळेचा जागा सोडण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या जुन्या इमारतीत एक खाजगी शाळेत भरते. या शाळेचे भाडेपत्रक नसल्याचे पंचायत समितीचा शिक्षण विभाग सांगते तर ५५ वर्षांचे भाडेपत्रक असल्याचे खाजगी शाळेचे मुख्याध्यापक सांगतात यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.एकीकडे जिल्हा परिषद शाळेला विद्यार्थी मिळत नाहीत. खाजगी शाळांच्या स्पर्धेत या शाळांना विद्यार्थी संख्या वाढविणे कठीण जाते. असलेले विद्यार्थी टिकविण्यासाठी धडपड सुरु असते़ खाजगी शाळा या शासनाच्या शाळाचे विद्यार्थी दाखवितात. गावातील जिल्हा परिषद शाळा बंद पाडण्यासाठी जे प्रयत्नशील असतात त्याच खाजगी शाळांना आपल्या छातीवर घेऊन जिल्हा परिषद शाळांना काय साध्य करायचे आहे हे कळायला मार्ग नाही. येथे जिल्हा परिषदेची माध्यमिक शाळा आहे. याच प्रांगणात कन्या शाळा आहे. मुलींचे हायस्कूल या नावाने खाजगी शाळाही याच शाळेच्या प्रांगणात भरते.१९८९ पासून ही शाळा येथे सुरु आहे. शाळेची सहाशे विद्यार्थीसंख्या आहे. या शाळेचा जागेचा वाद मंत्रालयापर्यंत गेला; पण खाजगी शाळेने जागा ताबा सोडला नाही. शिक्षण विभागाचे बीईओ म्हणतात, या शाळेचा जागेचा करार संपला आहे. पण संस्थाचालक माजी आमदार असल्यामुळे शाळा सुरु आहे. तर शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही. आर. धुळे म्हणतात, ५५ वर्षांचा करार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाशी झाल्याचे सांगतात; पण तशी कागदपत्रे शाळेकडे नाहीत. ती संस्थाचालकाकडे असल्याचे म्हणतात.याच शाळेची नवीन इमारत झाली व शाळा स्थलांतरित होत असल्याचे दोन-तीन वर्षांपासून सांगितले जाते. या शाळेला स्थलांतरित करुन शहरातील दुसऱ्या संस्थेला ही जागा भाडेतत्त्वावर देण्याचे ठरले होते. ही शाळा स्थलांतरित होणार होती; पण संस्थाचालकाचे चिरंजीव आमदार असल्याने पुन्हा हा विषय बंद झाला. अल्पदराने भाडे घेऊन येथे खाजगी शाळांना परवानगी देण्याचा हेतू काय? सरकारी शाळा बंद पाडून खाजगी शाळांचे पीक वाढविणारे कोण? त्यांना शोधले पाहिजे, अशी चर्चा सुरू आहे़

टॅग्स :NandedनांदेडSchoolशाळाEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र