शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

नांदेड जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांत साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:33 IST

जिल्ह्यात अनेक नद्यांचे जाळे पसरलेले असून, तब्बल १५६ गावे नदीकाठी असल्याने संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. नदीकाठच्या सर्व गावांमध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असून २४ तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनियंत्रण कक्ष कार्यरतसंभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा झाली सतर्क

नांदेड : जिल्ह्यात अनेक नद्यांचे जाळे पसरलेले असून, तब्बल १५६ गावे नदीकाठी असल्याने संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. नदीकाठच्या सर्व गावांमध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असून २४ तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आला आहे.नांदेड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांतून नद्या जातात. त्यामुळेच पावसाळ्यात नदीकाठच्या काही गावांना धोका होण्याची शक्यता असते. या अनुषंगाने प्रशासनाने उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. नांदेड तालुक्यात गोदावरी, आसना आणि सरगावनाला या नदीकाठी आठ गावे आहेत. तर किनवट तालुक्यात पैनगंगा, किनवट-नाला, वझरा नाला, इस्लापूर नाला, मारेगाव नाला आणि कमठाळा नाला आहे. या तालुक्यातील १८ गावे नदीकाठी आहेत. माहूर तालुक्यातून पैनगंगा, गोंडवडसा नाला जातो. या तालुक्यातील ५ गावे नदीकाठावर आहेत. हदगाव तालुक्यातून पैनगंगा, कयाधूसह कारवाड नदी जाते. या तालुक्यातीलही ५ गावे नदीकाठावर आहेत. भोकर आणि उमरी तालुक्यातून गोदावरी वाहते. यात उमरी तालुक्यातील १३ गावे नदीकाठावर आहेत. देगलूर तालुक्यातून मांजरा आणि लेंडी वाहते. या तालुक्यातील १८ गावे नदीकाठावर आहेत. कंधार आणि लोहा तालुक्यातून गोदावरी आणि मन्याड या नद्या वाहतात. कंधार तालुक्यातील १५ तर लोहा तालुक्यातील १२ गावे नदी काठावर आहेत. मुखेड तालुक्यातूनही मन्याड जाते. या तालुक्यातील ८ गावे नदीकाठावर असून, बिलोली तालुक्यातून मन्याडसह मांजरा आणि गोदावरी वाहते.या तालुक्यातील तब्बल २८ गावे नदीकाठी आहेत. या बरोबरच नायगाव ११, धर्माबाद ६, अर्धापूर १, हिमायतनगर ४ तर मुदखेड तालुक्यातील ४ गावे नदीकाठी आहेत. प्रशासनाची पावसाळ्यात या सर्व १५६ गावांवर विशेष नजर असणार आहे. या सर्व १५६ गावांच्या परिसरात ४१ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत.या आरोग्यकेंद्रांना नदीकाठच्या गावांची यादी देण्यात आली असून, या गावांना साथीबाबत जोखीमग्रस्त गावे समजून या गावांत साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना अग्रक्रमाने राबविण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आले आहेत.नदीकाठच्या गावांमध्ये साथीच्या आजारांची शक्यता गृहीत धरुन साथ उद्रेकाची सूचना मिळताच त्वरित पथकासह भेट देवून योग्य ती वैद्यकीय सेवा व साथ प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, साथरोग नियंत्रणासाठी मागील तीन वर्षांत साथ उद्रेक उद्भवलेली गावे तसेच मोठ्या यात्रा भरणारी गावे या बाबी विचारात घेऊन जोखीमग्रस्त गावांची यादी तयार करण्यात आली आहे. या १४ गावांत उपाययोजना करण्याबाबत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे. या भागात आरोग्यसेवा तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हास्तरावर २ व जिल्ह्यातून १६ अशी १८ वैद्यकीय पथकांची स्थापना केली आहे.या गावांवर असणार आरोग्य विभागाचे विशेष लक्ष

  1. मागील तीन वर्र्षांत जलजन्य साथ उद्रेक उद्भवलेल्या गावांवर आरोग्य विभागाचे विशेष लक्ष असणार आहे. यात नायगाव तालुक्यातील कोलंबी, माहूर तालुक्यातील चोरड, मुखेड तालुक्यातील हिप्परगा, लोहा तालुक्यातील गौडगाव आणि माळेगाव अािण कंधारसह तालुक्यातील उमरातांडा या गावांत मागील तीन वर्षांत साथीचा उद्रेक झाला होता. त्यामुळे या गावांवर यंदा विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. याबरोबरच मोठी यात्रा भरणारी माहूर, माळेगाव, वडेपुरी, दाभड आणि शिकारघाट ही गावेही जोखमीग्रस्त गावांच्या यादीत टाकण्यात आली आहेत.
  2. जोखीमग्रस्त भागांत साथ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १५ दिवसांतून किमान एकदा गावभेट द्यायची असून प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसा औषधीसाठा ठेवण्यात येत आहे.
टॅग्स :NandedनांदेडgodavariगोदावरीfloodपूरHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स