लॉकडाऊन पाळून रूग्णवाढ रोखा, अन्यथा व्यवस्था कोलमडण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:16 IST2021-04-19T04:16:21+5:302021-04-19T04:16:21+5:30
रविवारी सकाळी ते बोलत होते. दोन दिवसांपूर्वी लोहा तालुक्यात कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीने तीन वर्षांच्या मुलासह आत्महत्या करण्याच्या ...

लॉकडाऊन पाळून रूग्णवाढ रोखा, अन्यथा व्यवस्था कोलमडण्याची भीती
रविवारी सकाळी ते बोलत होते. दोन दिवसांपूर्वी लोहा तालुक्यात कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीने तीन वर्षांच्या मुलासह आत्महत्या करण्याच्या घटनेचा संदर्भ देत या घटनेवरून कोरोना रुग्णांची आणि त्यांच्या कुटुंबाची मानसिक स्थिती कशी असेल, याची कल्पना येते. मी आणि माझे कुटुंब या प्रसंगातून गेले आहे. विरोधकांवरही कधी अशा प्रसंगाला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये, असे सांगून परिस्थिती चिंताजनक असली तरी सर्वांनी मिळून धैर्याने त्याचा मुकाबला करावा लागणार असल्याचे ते म्हणाले. जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांचीही माहिती त्यांनी दिली. नांदेड येथील २०० खाटांचे जम्बो कोविड सेंटर उद्यापासून कार्यरत होणार आहे. तिथे ऑक्सिजनची सुविधा देखील उपलब्ध असेल. ग्रामीण भागातील नागरिकांना प्रारंभिक उपचार किंवा ऑक्सिजनसाठी नांदेडच्या रुग्णालयात येण्याची गरज भासू नये, यादृष्टीने ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक त्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. मध्यंतरी जिल्ह्यात ऑक्सिजन कमी पडेल असे वाटत होते; पण आता परिस्थिती नियंत्रणात आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी लाखो अनुयायांनी त्यांना घरूनच अभिवादन केले. त्याचप्रमाणे श्रीरामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती, महाराष्ट्र दिन, ईद आदी सण-उत्सव तसेच महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीला सुद्धा नागरिकांनी घरीच राहून श्रद्धा व्यक्त करावी, अशी विनंतीही अशोक चव्हाण यांनी केली.
कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी सेवाभावी स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे, इच्छुक संस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करावी. अशा संस्थांना कोविड सेंटरचे बाह्य व्यवस्थापन, कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मदत करणे आदी कामांसाठी मदतीला घेता येईल, असे ते म्हणाले.