शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

‘ग्रंथोत्सवातून वाचन संस्कृतीची जोपासना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 23:54 IST

पुस्तक वाचनातून वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. यातून समाज सुसंस्कृत होत जातो, यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम महत्त्वाचे ठरतात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.

नांदेड : पुस्तक वाचनातून वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. यातून समाज सुसंस्कृत होत जातो, यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम महत्त्वाचे ठरतात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय नांदेड यांच्यावतीने आयोजित ग्रंथोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डोंगरे यांच्या हस्ते झाले़ त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालयाचे अध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड़ गंगाधर पटणे हे होते. तर विभागीय सहनिबंधक तथा साहित्य अकादमी पुरस्कारविजेते साहित्यिक श्रीकांत देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर, औरंगाबादचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, उच्च शिक्षण विभागाचे वरिष्ठ लेखाधिकारी नीळकंठ पांचगे, जि़ प़ चे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगुंडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे, माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख, ग्रंथालय चळवळीचे बी. जी. देशमुख, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी डोंगरे म्हणाले, नवीन पिढीचे समाजमाध्यमांवरील वाचन वाढले आहे, अशावेळी पुस्तक वाचनाला विसरुन चालणार नाही. वाचनातील आकलन करुन ते कृतीत विचार आले पाहिज़े‘उज्ज्वल नांदेड’ या उपक्रमात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची डोंगरे यांनी यावेळी माहिती दिली. पुस्तक वाचनातून स्पर्धा परीक्षा देणाºया अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडले आहे. त्यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुस्तके देवून त्यांना उज्ज्वल जीवनाकडे नेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन डोंगरे यांनी केले़माजी आमदार अ‍ॅड़ पटणे म्हणाले, अवांतर वाचनाची आवड लहानवयातून झाली तर कोणत्याही क्षेत्रात त्यांना सहज यश मिळते. नांदेड ग्रंथोत्सवात विविध दालनांत उपयुक्त ग्रंथ उपलब्ध आहेत. ते खरेदी करुन वाचली पाहिजे,असे आवाहन करताना नांदेड महानगरपालिकेने त्यांच्या राममनोहर लोहिया सार्वजनिक वाचनालयाची नवीन इमारत वाचकांसाठी लवकर उभी करावी, अशी मागणी केली.विभागीय सहनिबंधक श्रीकांत देशमुख म्हणाले, ग्रंथवाचनातून विचार करण्याची क्षमता वाढते. अनेक समाजसुधारकांनी ज्ञानातून समाज घडविला. आधुनिक भारत ज्ञानातून घडत आहे. अनावश्यक खर्च टाळून पुस्तके खरेदी करावीत. घराचा स्वर्ग करायचे असेल, तर त्याठिकाणी पुस्तक असले पाहिजे. ती वाचली पाहिजेत असेही ते म्हणाले़सहाय्यक ग्रंथालय संचालक हुसे यांनी ‘नांदेड ग्रंथोत्सव’ हा नेहमीच राज्यात पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. जिल्ह्यातील ग्रंथालयांनी येथील दालनातून उपयुक्त ग्रंथांची खरेदी करुन आपले ग्रंथालये विविध ग्रंथांनी परिपूर्ण ठेवावीत, असे आवाहन केले.जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी प्रास्ताविकात ‘नांदेड ग्रंथोत्सव’ आयोजनामागची भूमिका मांडली. वाचनसंस्कृती वाढावी, त्यांना नवीन ग्रंथ मिळावे यासाठी हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. ग्रामीण भागात ग्रंथचळवळीचे चांगले काम होत आहे. शासनाने पुस्तकाचे गाव म्हणून सातारा जिल्ह्यातील भिल्लार गावाची निवड केली आहे, तशी गावे नांदेड येथे झाली पाहिजेत, असेही ते म्हणाले़ प्रास्ताविक देवदत्त साने यांनी केले तर प्रताप सूर्यवंशी यांनी आभार मानले.ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाला सुरुवातशनिवारी सकाळी ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाची सुरुवात करण्यात आली. ही ग्रंथदिंडी महात्मा फुले पुतळा आयटीआयपासून कुसुम सभागृहमार्गे जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या आवारात पोहोचली. ग्रंथदिंडीची सुरुवात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते पूजनाने झाली.४ या ग्रंथदिंडीमध्ये मधुबन महाराज हायस्कूल (धनेगाव), शारदा भवन हायस्कूल (नांदेड), विमलेश्वर वारकरी शिक्षण संस्था (मरळक), वारकरी सांप्रदाय भजनी मंडळ (हाळदा), बंजारा महिला नृत्य (वर्ताळा तांडा ता. मुखेड), तसेच शाहीर जाधव व चमू (सुजलेगाव ता. नायगाव) इत्यादींनी सहभाग घेतला होता. या दिंडीत साहित्यिक, ग्रंथप्रेमी आणि ग्रंथचळवळीतील मान्यवर सहभागी झाले होते.

टॅग्स :NandedनांदेडNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडcollectorजिल्हाधिकारी