सालाना बरसी उत्सवाची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:19 IST2021-07-27T04:19:15+5:302021-07-27T04:19:15+5:30
या वर्षीची बरसी २, ३, ४ ऑगस्ट या दरम्यान नगिना घाट येथील लंगर साहिब गुरुद्वारामध्ये साजरी होणार आहे. लंगर ...

सालाना बरसी उत्सवाची जय्यत तयारी
या वर्षीची बरसी २, ३, ४ ऑगस्ट या दरम्यान नगिना घाट येथील लंगर साहिब गुरुद्वारामध्ये साजरी होणार आहे. लंगर साहिबचे संस्थापक संत बाबा निधानसिंघजी, संत बाबा हरणामसिंघजी, संत बाबा आत्मासिंघजी व संत बाबा शीशासिंघजी कारसेवावाले यांची सालाना बरसी साजरी करण्यात येणार आहे. लंगर साहिबचे प्रमुख जथेदार संत बाबा नरेंद्रसिंघ आणि संत बाबा बलविंदरसिंघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव साजरा होतो आहे. बरसी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कीर्तन, प्रवचन, रागी जथे, लंगर महाप्रसाद आदी कार्यक्रमाचा या उत्सवात समावेश राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सचखंड गुरुद्वाराचे मुख्य पुजारी सिंघ साहिब संत बाबा कुलवंतसिंघ व पंचप्यारे साहेबांन, संत बाबा गुरुदेवसिंघ शहिदीबाग आनंदपूर साहिब, गुरुद्वारा बोर्डाचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन गुरुद्वारा लंगर साहिबचे मुख्य जथेदार संत बाबा नरेंद्रसिंघ व संत बाबा बालविंदरसिंघ यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याही वर्षी भाविकांची उपस्थिती आणि कोरोना आपत्तीची सर्व नियमाचे पालन करत उत्सव साजरा केला जाणार आहे. दरम्यान, बरसीच्या निमित्ताने ३ आणि ४ ऑगस्ट रोजी नगीना घाट येथील संत बाबा निधान सिंघ जी मेमोरियल हॉस्पिटलच्या वतीने मोफत दन्त चिकित्सा आणि फिजियोथेरेपी शिबिराचे आयोजन केले जात आहे.