शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

गर्भवती पत्नीचा गळा आवळून पतीने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 16:33 IST

पती-पत्नीमध्ये मध्यरात्री झाला वाद

कृष्णूर (जि. नांदेड) :  गुढीपाडव्याच्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादात पतीने सात महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीचा गळा दाबून खून केला. नंतर स्वत:  गळफास घेऊन आत्महत्या केली. शुभांगी गंगाधर गवाले (२०) असे मृत पत्नीचे नाव असून गंगाधर भुजंग गवाले (२२) असे पतीचे नाव आहे. ही दुर्देवी घटना  रविवारी सकाळी उघडकीस आली़ वर्षभरापूर्वी त्यांचा विवाह झाला होता.

सात महिन्यांची गरोदर असलेली शुभांगी एक महिन्यापूर्वी माहेरी कृष्णूर येथे होती़ त्यानंतर दोन दिवसांपूर्वी तिचा पती गंगाधर गवाले हा पत्नीला भेटण्यासाठी म्हणून कृष्णर येथे आला होता़ दोघेही पती-पत्नी पाडव्याच्या संध्याकाळी जेवण करून घरामध्ये झोपले  होते़ दोघांमध्ये रात्री कोणत्यातरी कारणावरुन वाद झाला होता़ त्या वादानंतर गंगाधर गवाले याने गळा आवळून पत्नी शुभांगीचा खून केला़ त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली़  घटनेची माहिती कुंटूर पोलिसांना कळविण्यात आली़ सपोनि. शरद मोरे व त्यांचे सहकारी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी  स्थळाचा पंचनामा केला़ 

शेजाऱ्यांच्या मदतीने उघडला दरवाजा सकाळी शुभांगीची आजी त्यांना बाहेरून आवाज देत होती़ परंतु आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे तिने खिडकीतून आतमध्ये पाणी टाकले़ तरीही दरवाजा उघडत नसल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने तो उघडण्यात आला़ यावेळी खाटेवर नात शुभांगी मृतावस्थेत पडलेली दिसून आली तर नातजावई गंगाधर भुजंगा गवाले याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.  

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्याFamilyपरिवार