पवित्र रमजान महिन्यात घरातच नमाज अदा करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:17 IST2021-04-16T04:17:20+5:302021-04-16T04:17:20+5:30
पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम समाजामध्ये मोठया संख्येने मशिदीमध्ये जाऊन सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. या कालावधित मुस्लिम समाज ...

पवित्र रमजान महिन्यात घरातच नमाज अदा करावी
पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम समाजामध्ये मोठया संख्येने मशिदीमध्ये जाऊन सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. या कालावधित मुस्लिम समाज बांधव नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. कोरोना विषाणूंचा संसर्ग लक्षात घेता पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी आपले नियमित नमाज पठण, तरावीह तसेच सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करावेत. याचबरोबर पुढील बारा सुचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
सार्वजनिक ठिकाणी एकावेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता सोशल डिस्टन्सींग व स्वच्छेतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन पवित्र रमजान महिना अत्यंत साधेपणाने साजरा करावा.
सेहरी व इफ्तारच्या वेळी अनेक फळ व इतर अन्नपदार्थ विक्रेते यांच्याकडे गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने स्थानिक प्रशासनाने याबाबत योग्य ती उपाययोजना करावी.
कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणीही मशिदीमध्ये दुवा पठणाकरीता एकत्र जमू नये. आपापल्या घरातच दुवा पठण करावे.
शब-ए-कदर ही पवित्र रमजान महिन्याच्या २६ व्या दिवशी साजरी करण्याची प्रथा आहे. या निमित्ताने मुस्लिम बांधव तरावीह संपल्यानंतर आपल्या विभागातील मशिदीमध्ये रात्रभर कुराण पठण व नफील नमाज अदा करतात. परंतू यावर्षी सर्व मुस्लिम बांधवांनी सदर धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरात राहूनच करावेत.
पवित्र रमजान महिन्यात बाजारामध्ये सामान खरेदीकरीता गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले असल्यास त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे.