शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

प्रयागराज दुर्घटनेतील मृताचे घर फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 00:58 IST

नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे बुधवारी मधयरात्रीनंतर चोरट्यांनी दोन घरे फोडून रोख रकमेसह सोन्या चांदीच्या दागिन्यासह लाखोंचा ऐवज लांबविला़ घटनास्थळी श्वानपथक, ठसेतज्ज्ञ यांनी पाहणी केली़ पण चोरांचा मागोवा लागला नाही़

ठळक मुद्देकोलंबी ता. नायगाव येथील घटनारोख रक्कमेसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास

गडगा : नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे बुधवारी मधयरात्रीनंतर चोरट्यांनी दोन घरे फोडून रोख रकमेसह सोन्या चांदीच्या दागिन्यासह लाखोंचा ऐवज लांबविला़ घटनास्थळी श्वानपथक, ठसेतज्ज्ञ यांनी पाहणी केली़ पण चोरांचा मागोवा लागला नाही़उत्तरप्रदेश प्रयागराज बोट दुर्घटनेत मरण पावलेल्या कोलंबी ता़ नायगाव येथील रमेश दिगंबर बैस यांच्या घरातकर्ता पुरुष राहिला नाही़ दरम्यान, घरातील महिला नांदेडला मुला-मुलीकडे गेल्या होत्या़ त्यामुळे घर कुलूपबंद होते़, याची संधी साधून चोरट्यांनी ३० जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर बैस यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश मिळविला़ घरातील कपाट व तीन पेट्या फोडून गंठन, नेकलेस, पाटल्या, अंगठी, झुंबर, ब्रासलेट असे १६ तोळ्याचे सोन्याचे दागिने व रोख सव्वा लाख रुपये असा एकूण ६ लाख १० हजारांचा ऐवज लांबविला़त्यानंतर चोरट्यांनी शंकरराव चव्हाण विद्यालयाचे अध्यक्ष उद्धवराव रामराव बैस यांच्या घरात बाहेर रस्त्याला शेजारी असलेली शिडी लावून घरात प्रवेश केला़ तेथे भींतीवर बसवलेल्या आलमारी (लाकडी) मध्ये असलेले रोख ५० हजार रुपये व अंगणात ठेवलेली एम़एच़२६- बी़जी़ ६३६५ क्रमांकाची मोटरसायकल घेऊन चोरटे पसार झाले़ नंतर गावाच्या उत्तर दिशेला मुख्य रस्त्यालगत असलेल्या सेवानिवृत्त शिक्षक एचक़े ़ बैस यांच्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करीत असताना बैस जागे झाले़ त्यांनी आरडाओरड करताच चोरट्यांनी धूम ठोकली़घटनेनंतर घटनास्थळी पो़उ़नि़ शिवराज धडवे, जमादार लक्ष्मण पाटील यांनी भेट दिली़ त्यानंतर श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले़ घटनास्थळी श्वानपथक आले़ चोरीच्या ठिकाणी आल्यानंतर श्वान तेथेच घुटमळले़ या प्रकरणी उशिरापर्यंत नायगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली नव्हती़निष्ठूर चोर, गाफील यंत्रणाउत्तरप्रदेश राज्यातील प्रयागराज येथे बोट दुर्घटनेत नायगाव तालुक्यातील कोलंबी येथील बैस कुटुंबातील दिगांबर रामराव बैस (वडील), रमेश दिगांबर बैस (मुलगा), बैस कुटुंबियाचे जावई डॉ़देवीदास नारायण कच्छवे यांच्यासह सात-आठ जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना १० डिसेंबर रोजी घडली होती़ या घटनेने बैस कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळला़ यात आता कर्ता पुरुषच राहिला नाही़ त्यानंतर घटनेच्या दुसऱ्याच दिवशी मयत डॉ़देवीदास कच्छवे यांचे नायगाव बाजार येथील घर चोरट्यांनी १४ डिसेंबर रोजी साफ केले़ त्या चोरीच्या घटनेत २० तोळे सोने, ६ तोळे चांदी चोरट्यांनी लंपास केली़ या चोरीचा तपास लावण्यात अद्यापही पोलिस यंत्रणेला यश आले नाही़ तेच पुन्हा एकदा बैस कुटुंबातील मयत रमेश बैस यांचे घर बुधवारी रात्री साफ केले़

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीNanded policeनांदेड पोलीस