शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आंबेडकर म्हणे... 'आमचं सरकार आल्यास जुन्या नोटा बदलून देणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 23:56 IST

नोटाबंदीमुळे देशातील व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अनेक व्यापाऱ्यांनी त्यामुळेच आत्महत्या केल्या असून इतर व्यापाऱ्यांना धाड टाकण्याच्या धमक्या सरकार देत आहे. 

नांदेड : नोटाबंदीमुळे देशातील व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अनेक व्यापाऱ्यांनी त्यामुळेच आत्महत्या केल्या असून इतर व्यापाऱ्यांना धाड टाकण्याच्या धमक्या सरकार देत आहे. अशा स्थितीत वंचित आघाडीची सत्ता आल्यास व्यापा-यांकडील जुन्या नोटा बदलून देऊ, असे आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. देशाला चौकीदाराची नव्हे तर एका अभ्यासू पंतप्रधानाची गरज असल्याचेही ते म्हणाले.वंचित बहुजन आघाडी उमेदवाराच्या प्रचारार्थ बुधवारी अ‍ॅड. आंबेडकर यांच्या किनवट आणि हदगाव येथे प्रचारसभा झाल्या. ते म्हणाले की, सरकारने नोटाबंदी केल्याने देशातील व्यापार, उद्योग ठप्प झाला आहे. काही नोटा बदलून मिळाल्या असल्या तरी अनेक व्यापा-यांकडे मोठ्या प्रमाणात जुन्या नोटांचा साठा आहे. या नोटा आम्ही आमची सत्ता आल्यास बदलून देऊ. मात्र चोरांचे सरकार पुन्हा येणार नाही, याची खबरदारी मतदारांनी घ्यायला हवी. देशाचा पंतप्रधान हा लोकांना उत्तर देणारा असावा. मात्र सध्याचे पंतप्रधान त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न देता केवळ मन की बात थोपतात. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या नातीच्या विवाहाला नरेंद्र मोदी उपस्थित होते. तेथे काही मोस्ट वाँटेड असलेल्या मंडळींचीही उपस्थिती होती. आमंत्रण नसताना अशा लग्नाला जाणे पंतप्रधान म्हणून टाळायला हवे होते असे ते म्हणाले. राज्य घटनेप्रमाणे मतदार हा या देशाचा राजा, तर लोकप्रतिनिधी सेवक आहेत. मात्र भाजपा सरकार पंतप्रधानांना देशाचा राजा करू पाहत असल्याचे सांगत यामुळे देशातील लोकशाही संकटात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. ही निवडणूक वंचित समाजाच्या अस्तित्वाचा लढा आहे. या लढ्यात आम्ही आमच्या हक्कासह जिंकून दाखवू असे सांगत न्याय व्यवस्थेमध्येही वंचितांना सन्मान मिळायला पाहिजे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९