ऑक्सिजन प्लांटचा वीजपुरवठा अखेर सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:16 IST2021-04-19T04:16:19+5:302021-04-19T04:16:19+5:30

दुरुस्ती केल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात झाला. केवळ वीज मीटरपर्यंत वीजपुरवठा सुरू आहे का एवढेच महावितरणच्या वतीने पाहिले जाते. मीटरमधून ...

The power supply of the oxygen plant is finally smooth | ऑक्सिजन प्लांटचा वीजपुरवठा अखेर सुरळीत

ऑक्सिजन प्लांटचा वीजपुरवठा अखेर सुरळीत

दुरुस्ती केल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात झाला.

केवळ वीज मीटरपर्यंत वीजपुरवठा सुरू आहे का एवढेच महावितरणच्या वतीने पाहिले जाते. मीटरमधून पास झालेल्या केबल, वायरिंगमधील दोष हा संबंधित यंत्रणेने पाहणे अपेक्षित असते. मात्र याबाबीकडे उपजिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे महावितरणचा वीजपुरवठा सुरळीत असतानाही ऑक्सिजन प्लांटचा वीजपुरवठा बंद राहिला होता.

गोकुंदा उपकेंद्रातील पाॅवर ट्रान्स्फाॅर्मरवरती एकूण पाच फीडर आहेत. यापैकी २ कृषी फीडर, २ गावठाण फीडर व एक एक्स्प्रेस फीडर आहे. वारंवार ११ केव्ही इनकमर ब्रेकर ट्रीप होत असल्यामुळे एक्स्प्रेस फीडरवरील वीजपुरवठा खंडित होत होता. एक्स्प्रेस फीडरवरील उपजिल्हा रुग्णालय येथील वीजपुरवठा अखंडित रहावा यासाठी किनवट येथील शहर फीडरला जोडण्यात आला आहे. सद्यस्थितीत रुग्णालय व ऑक्सिजन प्लांटचा वीजपुरवठा अखंडितपणे सुरू आहे.

Web Title: The power supply of the oxygen plant is finally smooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.