शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; मराठवाड्याला पुन्हा 'लाल दिवा' मिळणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 12:04 IST

मराठवाड्याला मंत्रिपदाचे वेध; आमदार चिखलीकर, नवघरे, विटेकर चर्चेत; नवतरुण चेहरा म्हणून नवघरे आघाडीवर

- श्रीनिवास भोसलेनांदेड : मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यामुळे मंत्रिमंडळातील रिक्त जागेवर मराठवाड्याला प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसे झाल्यास आमदार प्रतापराव चिखलीकर, आमदार राजू नवघरे आणि आमदार राजेश विटेकर यांच्यापैकी कोणाला मंत्रिपदाची संधी मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला मराठवाड्यात विधानसभेच्या आठ जागांवर यश मिळाले होते. यामध्ये धनंजय मुंडे - परळी, विजयसिंह पंडित - गेवराई, प्रकाश सोळंके - माजलगाव, प्रतापराव चिखलीकर - लोहा, राजेश विटेकर - पाथरी, राजू (चंद्रकांत) नवघरे - वसमत, संजय बनसोडे -उदगीर आणि बाबासाहेब पाटील - अहमदपूर यांचा समावेश आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणात धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांचा सहभाग समोर आल्याने त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर मराठवाड्याला पुन्हा मंत्रिपद दिले जाईल, अशी चर्चा होती. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. त्यातच आता मंत्री माणिकराव कोकाटे यांनीही राजीनामा दिल्याने मराठवाड्यातील आमदारांसह अजितदादांच्या कार्यकर्त्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेले हे राजीनामा-नाट्य राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर परिणाम करू शकते. त्यामुळे ‘डॅमेज कंट्रोल’साठी अजित पवार गटाकडून नव्या चेहऱ्याला मंत्रिपदाची संधी दिली जाईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. पूर्व मराठवाड्यावर सातत्याने अन्याय होत असल्याची भावना यापूर्वीपासूनच नागरिकांमध्ये आहे. आमदार चिखलीकर, आमदार नवघरे आणि आमदार विटेकर यांची नावे चर्चेत असली तरी परभणी जिल्ह्याला भाजपकडून आधीच मंत्रिपद मिळाल्याने राष्ट्रवादीच्या कोट्यातून नांदेड किंवा हिंगोली जिल्ह्याला संधी दिली जाण्याची शक्यता अधिक मानली जात आहे.

नांदेड आणि हिंगोलीवर अन्याय का?नांदेड जिल्ह्याने विधानसभेत शंभर टक्के स्ट्राइक रेट साधला असतानाही भाजप, शिवसेना किंवा राष्ट्रवादी या महायुतीतील कोणत्याही पक्षाने नांदेडला मंत्रिपद दिलेले नाही. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या काळात सातत्याने मंत्रिपद लाभलेल्या नांदेडवर महायुती सरकारच्या काळात अन्याय झाल्याची भावना तीव्र आहे. भाजपचे पाच, शिंदे शिवसेनेचे चार आणि राष्ट्रवादीचा एक आमदार असूनही नांदेडला सत्ताधाऱ्यांकडून सापत्न वागणूक मिळत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, हिंगोली जिल्ह्यातील वसमत मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार राजू नवघरे हे सामान्य कुटुंबातून पुढे आलेले, नवतरुण आणि सक्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर आहे. आता मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार मराठवाड्यावरील हा अन्याय दूर करणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

शिवसेनेकडूनही मराठवाड्याकडे दुर्लक्षचमराठवाड्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष प्रेम असल्याचे सांगितले जाते. मात्र, मंत्रिपद वाटपात मराठवाड्याला अपेक्षित स्थान मिळालेले नाही. नांदेडमधून आमदार हेमंत पाटील आणि आमदार बालाजीराव कल्याणकर यांची नावे आघाडीवर होती. हेमंत पाटील यांना तर मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी मुंबईला पाचारणही करण्यात आले होते. मात्र, अखेरच्या क्षणी नांदेडची संधी हुकली. आजघडीला फेरबदलाची चर्चा असताना पुन्हा आमदार पाटील यांच्यासह बालाजी कल्याणकर आणि आमदार संतोष बांगर यांचे नाव चर्चेत आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kokate's resignation sparks NCP activity; Marathwada to get ministerial berth?

Web Summary : Manikrao Kokate's resignation revives Marathwada's hope for ministerial representation. Chikhlikar, Navghare, and Vitekar are potential candidates. Nanded and Hingoli eye the opportunity, addressing historical neglect in cabinet positions. Ajit Pawar's decision is awaited amid discussions of injustice.
टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाNandedनांदेडHemant Patilहेमंत पाटीलPratap Patil Chikhalikarप्रताप पाटील चिखलीकर