शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

पोलिस पाटलाने ग्रामपंचायतमध्ये संपवले जीवन; पीएसआयने त्रास दिल्याचा व्हिडीओत उल्लेख

By शिवराज बिचेवार | Updated: July 22, 2024 18:55 IST

मृत्यूपूर्वी मोबाईलमध्ये व्हिडीओ करत सांगितले कारण

निवघा बाजार (जि.नांदेड)- हदगाव तालुक्यातील पेवा येथील पोलिस पाटील बालाजी केशवराव जाधव यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या एका खोलीत गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून जाधव यांनी मृत्यूपूर्वी केलेल्या व्हिडीओत त्यांनी हदगावचे पोलिस उपनिरिक्षक भडीकर यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

पोलिस पाटील बालाजी जाधव हे सोमवारी सकाळी घराकडून ग्रामपंचायत कार्यालयात आले होते. त्यांना काही कामानिमित्त हदगाव येथे जायचे होते. ते कार्यालयात आले तेव्हा बंद होते. यावेळी त्यांनी काही दिवसापूर्वी गावात बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांची झोपण्याची व्यवस्था म्हणून अंथरुन-पांघरण आणले होते. ते ग्रामपंचायतच्या एका खोलीत होते. ते नेण्यासाठी त्यांनी खोली उघडायला लावली. त्यानंतर छताला नायलॉन दोरीने गळफास घेतला. बराचवेळ झाला तरी पेालिस पाटील बाहेर का आले नाही म्हणून ग्रामस्थांनी आत डोकावून पाहिले असता त्यांना जाधव यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. छताच्या कडीपर्यंत हात पोहचत नसल्याने त्यांची खुर्च्या एकमेकात टाकून छताला दोरी बांधली होती. दरम्यान मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ केला होता. या व्हिडीओमध्ये ते मृत्यूस पोलिस उपनिरिक्षक भडीकर जबाबदार असल्याचे म्हणत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे हदगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. मयत जाधव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे.

ज्येष्ठ नागरीकांची सेवा अपुरी राहिलीमाझ्या मृत्यूला पीएसआय भडीकर हे जबाबदार आहेत. त्यांनी माझ्यावर एवढा अन्याय करायला नको होता. पूर्ण माहिती देवूनही घटनेची मी माहिती लपवून ठेवली असे त्यांनी म्हटलं. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. गावाने शांततेत रहावं. माझी ज्येष्ठ नागरीकांची सेवा होती ती अपुरी राहिली. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवितो. असे जाधव यांनी मृत्यूपूर्वी केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडPoliceपोलिस