शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

हगणदारीमुक्ती व प्लास्टिकबंदीचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:15 IST

हगणदारीमुक्त गाव स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गावागावांत शौचालय बांधकाम करण्यात आली. या शौचालयाचा वापर करण्यासाठी जनजागृतीद्वारे महत्त्व सांगण्यात आले. या अभियानावर आजवर कोट्यवधी रुपये खर्च झाले. मात्र उन्हाळ्याचे दिवसांत पाणी मिळणे कठीण झाले

ठळक मुद्देबिलोली, माहूर तालुक्याचे चित्र नियोजनाचा अभाव, ग्रामीण भागात उघड्यावर सर्रास शौच

बिलोली : हगणदारीमुक्त गाव स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गावागावांत शौचालय बांधकाम करण्यात आली. या शौचालयाचा वापर करण्यासाठी जनजागृतीद्वारे महत्त्व सांगण्यात आले. या अभियानावर आजवर कोट्यवधी रुपये खर्च झाले. मात्र उन्हाळ्याचे दिवसांत पाणी मिळणे कठीण झाले असताना शौचालयात टाकायला पाणी कोठून आणावे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत नाईलाजास्तव जुनीच परंपरा सुरु करीत उघड्यावर प्रातर्विधी उरकवित असल्याने हगणदारीमुक्त गाव स्वच्छता अभियानास ग्रहण लागले आहे.यंदा बिलोली तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला. परिणामी जमिनीतील पाण्याची पातळी कमालीची खालावली. अशा भीषण परिस्थितीत ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या शासकीय योजना एकप्रकारे पाण्याअभावी शोभेच्या वास्तू बनल्याचे दिसून येत आहे.शौचालय बांधकामासाठी सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात बहुतांश अंशी शासनाला यश सुद्धा आले. परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी नागरिकांना पाणी मिळणे दुरापस्त झाल्याने शौचालयात टाकायला कोठून पाणी आणावे, असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहत आहे. एकूणच हगणदारीमुक्तीची चर्चा तालुक्यात सर्वत्र जोर पकडत आहे़रोगराईचा झपाट्याने प्रसारग्रामीण भागात शौचालयाअभावी नैसर्गिक प्रात:विधी उघड्यावर उरकवली जात असल्याने रोगराईचा प्रसार झपाट्याने व्हायचा. शिवाय यात महिलांना मोठी कुचंबणा सहन करावी लागायची. ही परिस्थिती बदलण्यासाठी शासनाने अनुदानातून शौचालय बांधकाम व वापराकरीता प्रोत्साहन दिले. नैसर्गिक आपत्तीमुळे पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी नागरिकांना पाणी मिळणे दुरापस्त झाल्याने शौचालयात टाकायला कोठून पाणी आणावे, असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहत आहे.माहुरात प्लास्टिक पिशव्यांचा खचश्रीक्षेत्र माहूर : प्लास्टिक बंदीचा गतवर्षी निर्णय घेतल्यानंतरही माहूर शहरासह ग्रामीण भागात सरास प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर सुरू आहे. ५0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचे विघटन होत नसल्यामुळेच शहराच्या कानाकोपºयात प्लास्टिक पिशव्यांचा खच साचला आहे.सद्यस्थितीत सगळीकडे लगीनघाई दिसून येत आहे. यामध्ये प्लास्टिक पत्रावळी, पाणी ग्लास, थर्माकॉल द्रोणचा वापर होत आहे़ मात्र या उष्ट्या प्लास्टिक पत्रावळी, पाणी ग्लास, थर्माकोल, द्रोण नागरिक गावाच्या बाहेर आणून फेकून देतात. यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्लास्टिक पत्रावळी, ग्लास, थर्माकॉल द्रोण, प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळून आल्यास संबंधित व्यावसायिकांना दंड लावण्यात येत नाही.

टॅग्स :NandedनांदेडPlastic banप्लॅस्टिक बंदीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान