‘सिडको’मध्ये वृक्ष लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST2020-12-29T04:16:29+5:302020-12-29T04:16:29+5:30

नांदेड : येथील महानगरपालिका व वृक्षमित्र फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून वृक्ष लागवड करत ‘हरित नांदेड’ हे अभियान राबविण्यात ...

Planting trees in CIDCO | ‘सिडको’मध्ये वृक्ष लागवड

‘सिडको’मध्ये वृक्ष लागवड

नांदेड : येथील महानगरपालिका व वृक्षमित्र फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून वृक्ष लागवड करत ‘हरित नांदेड’ हे अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शहरातील विविध कॉलनी, मोकळ्या जागेत, मुख्य रस्ते, विविध उद्यानांमध्ये जिथे संगोपनाची हमी असेल, तिथे वृक्ष लागवड केली जात आहे.

या अभियानांतर्गत यावर्षी शहरात ४ ठिकाणी घनवन वृक्ष लागवड करण्यात आली आहे. आतापर्यंत वृक्षमित्र फाऊंडेशनने जिल्हाभरात २५ हजारांहून अधिक वृक्षांची लागवड वृक्षभेट देऊन केली आहे. दिनांक २७ डिसेंबर रोजी सिडको येथील माता कन्यका भवन मंगल कार्यालयाच्या परिसरात आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, उपाध्यक्ष सुभाष कन्नावार, सचिव गोविंद बिडवई, दिलीप कंदकुर्ते, डॉ. डी. आर. मुखेडकर, अनिल मनाठकर, ज्ञानेश्वर महाजन, सुधाकर वट्टमवार, डॉ. किरण चिद्रावार, पांडुरंग बच्चेवार, डॉ. नरेश रायेवार यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.

या अभियानासाठी वृक्षमित्र फाऊंडेशनचे कैलास अमिलकंठवार, गणेश साखरे, प्रीतम भारडीया, प्रल्हाद घोरबांड, लक्ष्मण गज्जेवार, माणिक अन्नपूर्णे, सचिन जोड, प्रदीप मोरलवार, मंगेश महाजन, प्रताप खरात, प्रशांत रत्नपारखी, मनोज गुंजावळे, लोभाजी बिरादार, गौरांग देशटवार, दत्ता पावडे, श्रीनिवास कोटगिरे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Planting trees in CIDCO