हरित नांदेड अभियानांतर्गत नांदेड शहरात पर्यावरणपूरक ११०० वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:14 IST2021-06-21T04:14:18+5:302021-06-21T04:14:18+5:30
रविवारी ११०० वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. महापालिका, वृक्षमित्र फाउंडेशन, क्रेडाई नांदेड तसेच लायन्स क्लब नांदेड प्राईड यांच्या वतीने रघुनाथनगर ...

हरित नांदेड अभियानांतर्गत नांदेड शहरात पर्यावरणपूरक ११०० वृक्षांची लागवड
रविवारी ११०० वृक्षरोपांची लागवड करण्यात आली.
महापालिका, वृक्षमित्र फाउंडेशन, क्रेडाई नांदेड तसेच लायन्स क्लब नांदेड प्राईड यांच्या वतीने रघुनाथनगर तरोडा खु. येथे कॉलनी परिसरात वृक्षमित्र आनंदवन लागवड पद्धतीने ७०० वृक्षांची स्थानिक प्रजातींचा वापर करून लोकसहभागातून लागवड करण्यात आली; तसेच ३०० मोठ्या वृक्षांची संरक्षित जाळीचा वापर करून लागवड करण्यात आली.
मालेगाव रोड गजानन मंदिर परिसरात शालोम होमनगर परिसरातील नागरिकांनी लोकसहभागातून निसर्गपूरक १०० वृक्षांची संरक्षित जाळीसह लागवड करण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, तहसीलदार नांदेड किरण अंबेकर, संध्या बालाजीराव कल्याणकर, महापालिका सदस्य दीपक राऊत, सुनंदा पाटील, ज्योती कल्याणकर, सहायक आयुक्त संजय जाधव आणि मिर्झा फरहतुल्लाह बेग यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. सुनील श्रीवास्तव, केंद्रे, शुक्ला व सर्व नगरवासीयांनी सहभाग घेतला.
रघुनाथनगर, तरोडा (खु.) क्रेडाई संस्थेचे अध्यक्ष नितीन आगळे, सचिव अभिजित रेणापूरकर, हरीश लालवाणी, लायन्स क्लब प्राईडचे अध्यक्ष योगेश मोगडपल्ली तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.
वृक्षमित्र फाउंडेशनचे संतोष मुगटकर, प्रीतम भराडिया, सचिन जोड, कैलास अमिलकंठवार, गणेश साखरे, प्रल्हाद घोरबांड, प्रदीप मोरलवार, राज गुंजकर, रूपेश गायकवाड, प्रताप खरात, संजय गौतम, मंगेश महाजन, डॉ. चिमणे तुळशीराम, लोभाजी बिराजदार यांनी वरील दोन्ही कार्यक्रमांत सहभाग घेतला.
महापालिका आयुक्त डॉ. लहाने यांनी याप्रसंगी सांगितले, मागील तीन वर्षांपासून वृक्षमित्र फाउंडेशन यांचे सुरू असलेले हरित नांदेड करण्याचे काम अतुलनीय आहे. शहरात जे नागरिक वृक्षरोपणासाठी संरक्षित जाळी किंवा बांबूचे ट्रीगार्ड लोकसहभागातून उपलब्ध करून देतील, त्या भागात महापालिका आणि वृक्षमित्र फाउंडेशनतर्फे वृक्ष उपलब्ध करून खड्डे खोदून वृक्षारोपण करून देण्यात येईल, असेही आयुक्त लहाने यांनी सांगितले.