केवळ देखावा न करता मनापासून वृक्षलागवड करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST2021-06-02T04:15:31+5:302021-06-02T04:15:31+5:30

संस्कार भारती नांदेडचे अध्यक्ष दि. मा. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि संरक्षक डॉ. दीपक कासराळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. ...

Plant trees wholeheartedly, not just in appearance | केवळ देखावा न करता मनापासून वृक्षलागवड करा

केवळ देखावा न करता मनापासून वृक्षलागवड करा

संस्कार भारती नांदेडचे अध्यक्ष दि. मा. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि संरक्षक डॉ. दीपक कासराळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.

डॉ. किन्हाळकर म्हणाल्या की, संकटं कधीच एकटी येत नाहीत. अनेक अडचणी, संकटे हातात हात घालून येतात. इतर संकटांच्या वेळी आपण एकमेकांना प्रत्यक्ष भेटून धीर देऊ शकत होतो ,परंतु आता असं करता येणार नाही, हा एक मोठा फरक सांगता येईल. कोरोनाने आपल्याला स्पर्शाचे महत्त्व, स्वच्छतेचे महत्त्व, नातेसंबंधांचे महत्त्व, शिस्तीचे महत्त्व, निसर्ग समृद्धीचे महत्त्व, स्वत्व शोधण्याचं महत्त्व शिकविले आहे. आपल्याला स्वतःमध्ये डोकावून पाहता आले पाहिजे. गरजा आणि अपेक्षा, हाव यांच्यातील सीमारेषा समजून घेऊन, गरजा सीमित करून जगणं आवश्यक असल्याचे जाणीवपूर्वक स्वतःला शिकवावे लागेल. हे करण्यासाठी मनाचा व्यायाम अतिशय आवश्यक आहे, असे मत त्यांनी मांडले. प्रश्नोत्तरांच्या भागात श्रोत्यांच्या काही शंकांचे निरसन त्यांनी केले.

प्रारंभी संस्कार भारती ध्येय गीत मानसी कुलकर्णी-देशपांडे यांनी सादर केले. डॉ. किन्हाळकर यांचा परिचय जयंत वाकोडकर यांनी करून दिला. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सुवर्णा कळसे यांनी केले. आभार दीप्ती उबाळे यांनी मानले. तांत्रिक बाजू नेहा देशपांडे यांनी सांभाळली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रांत कार्याध्यक्ष भगवानराव देशमुख, अभय शृंगारपुरे, डॉ. जगदीश देशमुख, डॉ. प्रमोद देशपांडे, अंजली देशमुख, आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Plant trees wholeheartedly, not just in appearance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.