डुकराने मृतदेहाचे तोडले लचके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:17 IST2021-01-21T04:17:04+5:302021-01-21T04:17:04+5:30

शासकीय रुग्णालयाच्या आवारात अनेक मनोरुग्ण नेहमी फिरताना आढळताना. त्यातील अनेकांचा दुर्धर आजाराने मृत्यू होतो. त्यानंतर पोलिस आकस्मिक मृत्यूची नोंद ...

The pig broke the carcass | डुकराने मृतदेहाचे तोडले लचके

डुकराने मृतदेहाचे तोडले लचके

शासकीय रुग्णालयाच्या आवारात अनेक मनोरुग्ण नेहमी फिरताना आढळताना. त्यातील अनेकांचा दुर्धर आजाराने मृत्यू होतो. त्यानंतर पोलिस आकस्मिक मृत्यूची नोंद करुन ओळख न पटल्यास अंत्यसंस्कार करण्यात येतात. परंतु अनेकवेळेला बेवारसांचे मृतदेह अनेक तास तसेच पडून असतात. बुधवारी सकाळी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर एका नाल्यात अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाचे डुकरे लचके तोडत होते. कमरेच्या खालील अर्ध्याहून अधिक भाग या डुकरांनी खाल्ला होता. ही बाब काही नागरीकांच्या निदर्शनास आली. त्यानंतर घटनास्थळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोनि.प्रशांत देशपांडे हे पोहचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेवून पंचनामा केला. मयताची मात्र अद्यापही ओळख पटली नाही. परंतु गंभीर घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मृतदेह रुग्णालयाच्या आवारात नसल्याचे सांगून रुग्णालय प्रशासनाने मात्र हात वर करीत पोलिसांकडे बोट दाखविले आहे.

Web Title: The pig broke the carcass