वीटभट्टीवर फुले - आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:17 IST2021-04-15T04:17:13+5:302021-04-15T04:17:13+5:30
नांदेड - तालुक्यातील वाजेगाव परिसरातील वीटभट्टीवर महात्मा जोतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती साजरी ...

वीटभट्टीवर फुले - आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी
नांदेड - तालुक्यातील वाजेगाव परिसरातील वीटभट्टीवर महात्मा जोतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. तसेच या निमित्ताने गरजू वीटकामगार महिला व पुरुषांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी साहित्यिक मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, समीक्षक गंगाधर ढवळे, मारोती कदम, विशालराज वाघमारे, मनोहर सर्जे, कुणाल भुजबळ, साईनाथ इंजेगावकर, सचिन कदम, घनश्याम विश्वकर्मा, मनोहर सर्जे, धम्मा आढाव, मुकादम एकनाथ भदरगे, निवृत्ती एडके यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला महिला वीटकामगार प्रिया गायकवाड, अनुसया कांबळे, उगवता भदरगे, मंगल सोनटक्के, चांगुणा एडके, आशा एडके, माया एडके, रत्नमाला एडके, सोनी गोविंद, शितल गोविंद, शिला सोनसळे, रोशनी गायकवाड, आकांक्षा गायकवाड, राहुल गायकवाड, गोविंद कांबळे, त्रीसरण भदरगे, अनिल सोनटक्के, सचिन सोनसळे, सूनील एडके, निवृत्ती एडके, सुरेश एडके, रविकिरण एडके, दीपक एडके, सतिश एडके, साहेबराव मेकाले, गोविंद गायकवाड आदी वीट कामगार स्री पुरुषांची उपस्थिती होती.