शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अर्धापूर शहरासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:42 IST

अर्धापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटविण्यासाठी पाणीपुरवठा योजनेला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या योजनेसाठी शासनाने २५.६१ कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहे.

ठळक मुद्देअशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश योजनेसाठी २५ कोटी ६१ लाखांचा निधी मंजूर; शहरवासियांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : अर्धापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटविण्यासाठी पाणीपुरवठा योजनेला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या योजनेसाठी शासनाने २५.६१ कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहे. माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण व भोकरच्या आ.अमिता चव्हाण यांनी या योजनेसाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता़अर्धापूर शहरास सध्या जुन्या पाणी पुरवठा योजनेतून पिण्याचे पाणी पुरविण्यात येते. परंतु पाण्याची असलेली उपलब्धता व शहराची वाढती लोकसंख्या यामुळे पाणीपुरवठ्यासाठी अडथळे येत होते. या पार्श्वभूमीवर खा. अशोकराव चव्हाण व आ़ अमिता चव्हाण यांनी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेसाठीचा प्रारुप आराखडा प्रशासनास तयार करण्याच्या सूचना दिल्या. नगरपंचायत प्रशासनाने तयार केलेला प्रारुप आराखडा शासन स्तरावर प्रलंबित होता. यासाठी खा. अशोकराव चव्हाण व आ. अमिता चव्हाण यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन सुमारे २५.६१ कोटींची कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर करुन घेतली आहे. या योजनेअंतर्गत उर्ध्व पैनगंगेच्या डाव्या कालव्यातून शहरापासून ६ कि.मी. अंतर असलेल्या निमगाव तलावामध्ये पाण्याची साठवणूक करण्यात येईल व गरजेनुसार या पाण्याचा उपसा करण्यात येईल. कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असली तरीही यावर्षी अर्धापूर शहरास पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये म्हणून खा़ चव्हाण यांनी १ एप्रिल रोजी एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये २० टँकरद्वारे उन्हाळ्यात पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला़ बैठकीस भाऊराव साखर उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव तिडके, नगराध्यक्ष प्रतिनिधी सोनाजी सरोदे, उपनगराध्यक्ष पप्पू बेग, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, तहसीलदार अरविंद नर्सीकर, मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर आदींची उपस्थिती होती. कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर करणे व २० टँकरद्वारे उन्हाळ्यात शहरात पाणीपुरवठा करण्याच्या निर्णयाचे नगराध्यक्षा प्रणिता सरोदे, उपनगराध्यक्ष पप्पू बेग व शहरातील नागरिकांनी स्वागत केले ़मालमत्ताकर वाढीसही मिळविली स्थगितीअर्धापूर नगरपंचायत प्रशासनाने वाढवलेल्या मालमत्ताकरास नागरिकांची मागणी लक्षात घेवून स्थगिती देण्यात आली आहे. अर्धापूर नगरपंचायत प्रशासनाने मागील काळात मालमत्ताकर वाढविण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात शहरातील नागरिकांनी हा वाढीव कर रद्द करावा, अशी मागणी खा. अशोकराव चव्हाण व आ. अमिता चव्हाण यांच्याकडे केली होती.नागरिकांच्या मागणीची दखल घेत खा.चव्हाण यांनी नगरपंचायतीने वाढविलेला मालमत्ताकर रद्द करावा अशा सूचना दिल्या होत्या. तसेच याबाबत बैठक घेण्याचे निर्देश दिले होते़त्यानंतर नगरपंचायतीची १५ मार्च रोजी सर्वसाधारण सभा झाली. या सभेमध्ये वाढविलेला मालमत्ताकर स्थगित करण्याचा निर्णय घेतला. नगरपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे़

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणWaterपाणी