शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बरसणार, कोकणात मुसळधार; पुढील २४ तासांसाठी असा आहे हवामान अंदाज
2
राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची भुजबळांकडून घोषणा; नाराजीच्या चर्चेवरही केलं भाष्य
3
आनंदाची बातमी! चांदी घसरली, 2000 रुपयांनी कोसळली! सोनंही 600 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 'लेटेस्ट रेट'
4
"सरकार बदलायचे आहे"; शरद पवारांच्या विधानानंतर भुजबळ गंभीर; म्हणाले, "ते कामाला लागलेत"
5
मनोज जरांगे आणखी आक्रमक होणार?; आरक्षणाबाबत सरकारला नवा अल्टिमेटम, म्हणाले...
6
सफरचंदावर का लावतात स्टिकर?; ९९% लोकांना माहीत नाही सत्य; किमतीशी नाही, आरोग्याशी संबंध
7
पेमा खांडू यांनी तिसऱ्यांदा घेतली अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
8
'हे' आहेत देशातील टॉप 10 श्रीमंत खासदार; संपत्ती वाचून व्हाल धक्क!
9
करुन दाखवलं! रिसेप्शनिस्टचं काम, जर्मनीतील नोकरी सोडली अन् स्वप्न साकार केलं; झाली IPS
10
'कृपा करा आणि बाजूला व्हा'; सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर संतापली तापसी
11
"दिवाली हो या होली, अनुष्का लव कोहली", Virat Kohli समोर चाहत्यांची घोषणाबाजी
12
"आम्हाला पण लिहिता येतं, रोष कुणावर आहे हे जरा..."; RSS च्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर
13
याला म्हणतात 'ढासू' रिटर्न...! ₹१५ च्या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹2 कोटी; दिला 25,000% चा परतावा, केलं मालामाल
14
सारा अली खानसोबत ब्रेकअपनंतर सिंगल आहे कार्तिक आर्यन, अनन्या पांडेसोबतही जोडलं गेलं नाव
15
Pankaja Munde : Video - "जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो, तुम्हाला माझी शपथ"; पंकजा मुंडेंची हात जोडून विनंती
16
अंतरवलीला उपोषणासाठी निघालेले ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना बार्शीत अटक
17
अजब-गजब! चीनने सार्वजनिक टॉयलेटच्या बाहेर लावले 'टायमर'; सोशल मीडियावर चर्चा
18
PAK vs IRE : पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; पाऊस शेजाऱ्यांना वर्ल्ड कपमधून बाहेर करणार?
19
एकाच वेळी 2 गुड न्यूज अन् शेअर बाजार पुन्हा विक्रमी उच्चांकावर; Sensex-Nifty नं घेतला रॉकेट स्पीड!
20
Video - कुवेतमध्ये अग्नितांडव! १९६ मजुरांना इमारतीत ठेवलेलं कोंबून; झोपेतच गमावला जीव

नांदेडकरांनी अपक्षांना धुडकावलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:27 AM

समाजकारणात वावरताना राजकारणात उतरण्याची ओढ सर्वांनाच लागते. त्यातूनच आपणही कधी ना कधी निवडणूक लढवावी, ही आंतरिक इच्छा कार्यकर्त्यांची असतेच. ज्या पक्षात काम करतो

ठळक मुद्देलोकसभेचा इतिहास : राष्ट्रीय पक्षालाच मतदारांचे प्राधान्य

अनुराग पोवळे।नांदेड : समाजकारणात वावरताना राजकारणात उतरण्याची ओढ सर्वांनाच लागते. त्यातूनच आपणही कधी ना कधी निवडणूक लढवावी, ही आंतरिक इच्छा कार्यकर्त्यांची असतेच. ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाकडे तशी मागणीही केली जाते. उमेदवारांच्या स्पर्धेत टिकाव न लागल्याने शेवटी बंडाचा झेंडा उभारुन अपक्ष म्हणून रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांना नांदेडकरांनी अद्याप स्वीकारले नाही.नांदेड लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून अपक्ष उमेदवार रिंगणात आहे. या उमेदवारांनी आतापर्यंत विजय मिळवला नसला तरीही आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न नेहमीच केला आहे. १९५१ च्या पहिल्या निवडणुकीत गोविंदराव महाले यांनी अपक्ष निवडणूक लढवत ३९ हजार ११२ मते घेतली होती. १९५७ च्या निवडणुकीत एकही अपक्ष उमेदवार रिंगणात उतरला नाही. अशी स्थिती १९७७ च्या निवडणुकीत राहिली. या निवडणुकीत केशवराव धोंडगे आणि गो. रा. म्हैसेकर यांच्यात थेट लढत झाली. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी आपला झेंडा रोवला. १९९६ च्या निवडणुकीत तब्बल १८ अपक्ष उमेदवार रिंगणात होते. तर १९९१ मध्ये १५, २००९ मध्ये ११, २०१४ मध्ये १३ अपक्ष उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली होती.१९५१ पासून झालेल्या १७ निवडणुकीत ८० अपक्ष उमेदवार मात्र एकाही अपक्ष उमेदवाराला नांदेडकरांनी संधी दिली नाही. १९८७ च्या पोटनिवडणुकीत प्रकाश आंबेडकर अपक्ष उमेदवार होते. त्यांचा थेट सामना अशोक चव्हाणांशी झाला होता. ही निवडणूक अशोक चव्हाणांसाठी पहिली लोकसभा निवडणूक होती.नांदेड लोकसभा मतदारसंघात अपक्षांनी आपली दावेदारी वारंवार सांगितली असली तरी मतदारांनी मात्र त्यांना धुडकावलेच आहे. राष्ट्रीय पक्षाचे उमेदवारच या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.यावर्षी सहा अपक्ष उमेदवार रिंगणातनांदेड लोकसभा मतदारसंघात यावर्षी सहा अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. मागील काही निवडणुकींचा इतिहास पाहता अपक्ष उमेदवार म्हणजे मते खाण्यासाठी उभे केलेले उमेदवार असाच त्यांचा प्रचार झाला. यंदाही अपक्षांचे कोणतेही आव्हान प्रमुख पक्षापुढे नसल्याचेच स्पष्ट चित्र आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडlok sabhaलोकसभा