१ ऑगस्ट रोजी लोक अदालतीचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:19 AM2021-07-27T04:19:17+5:302021-07-27T04:19:17+5:30

राष्ट्रीय विधिसेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधिसेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार ही लोक अदालत होणार असून, यात विशेष म्हणजे यावेळेस ...

People's Court on 1st August | १ ऑगस्ट रोजी लोक अदालतीचे आयोजन

१ ऑगस्ट रोजी लोक अदालतीचे आयोजन

Next

राष्ट्रीय विधिसेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधिसेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार ही लोक अदालत होणार असून, यात विशेष म्हणजे यावेळेस ई-लोक अदालतीचेही आयोजन करण्यात आले आहे. त्याद्वारे दूरचित्रसंवाद प्रणालीच्या माध्यमातून प्रकरणे तडजोड करून मिटविण्याची मुभा देण्यात आली आहे.

या लोकअदालतीत धनादेश अनादराची प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली प्रकरणे, कामगारांचे वाद, विद्युत आणि पाणी देयकाबाबतची प्रकरणे, तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, आयकर कायद्यातील फौजदारी स्वरूपातील तडजोडपात्र प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई देण्याबाबतची प्रकरणे, वैवाहिक वाद संपादन प्रकरणे व दिवाणी दावे, तसेच उपरोक्त नमूद स्वरूपातील दाखल पूर्व प्रकरणे सुनावणीकरिता ठेवण्यात येणार आहेत.

ज्या पक्षकारांना वर नमूद प्रकारची प्रकरणे १ ऑगस्ट रोजी लोकअदालतीत ठेवावयाची आहेत. त्या पक्षकारांनी संबंधित न्यायालयात आपापल्या प्रकरणात विनंती अर्ज लवकर सादर करावा. प्रकरण आपसी सामंजस्याने तत्काळ मिटवावे, असे आवाहन भारतीय स्टेट बँकेच्या नांदेड क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक शंकर येरावार यांनी केले आहे.

Web Title: People's Court on 1st August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.