शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

नांदेडकर हुशार; मोदींना फसले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:47 IST

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी जनतेला अनेक स्वप्ने दाखविली. या आश्वासनांना देशातील जनता भुलली. मात्र पाच वर्षांचा भाजपाचा कार्यकाळ पाहिल्यानंतर नांदेडमधील जनताच हुशार होती. जनतेने भाजपाच्या भाषणबाजीवर न भुलता अशोकरावांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विकास काँग्रेसमुळे झाला याची जिल्हावासीयांना जाणीव

नांदेड : २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी जनतेला अनेक स्वप्ने दाखविली. या आश्वासनांना देशातील जनता भुलली. मात्र पाच वर्षांचा भाजपाचा कार्यकाळ पाहिल्यानंतर नांदेडमधील जनताच हुशार होती. जनतेने भाजपाच्या भाषणबाजीवर न भुलता अशोकरावांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. आता तर नरेंद्र मोदींचा पाच वर्षांचा अपयशी कारभार आपल्यासमोर आहे. त्यामुळे नांदेडमधून पुन्हा अशोकराव चव्हाण मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.रविवारी रात्री वाजेगाव येथे काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या वतीने आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. मंचावर लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार खा. अशोकराव चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे यांनी दक्षिणमधून भरघोस मताधिक्य देवू, असा शब्द दिला तर मुस्ताक काझी यांनी ईदगाह मैदानासाठी ३५ लाख रुपये आणि वाजेगावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ८ कोटींचा निधी अशोकराव चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळेच मिळाल्याचे स्पष्ट केले.जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात शिवसेना-भाजपावर सडकून टीका केली. वर्धा, गोंदियात मोदींच्या सभांना प्रतिसाद मिळाला नाही. नांदेडमध्ये मोदींच्या चेहऱ्यावर उत्साह नव्हता. भाषणातही त्यांनी टीकेपलीकडे काही सांगितले नाही. पंतप्रधान म्हणून स्वत:च्या कार्यक्रमाबद्दल बोलायला हवे. शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांसह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय धोरण मांडायला हवे. मात्र पाच वर्षांत काहीच केलेले नसल्याने पंतप्रधान आता पातळी सोडून टीका करीत फिरत असल्याचे पाटील यांनी सांगितले. पाच वर्षांत देशवासीयांची फसवणूक केल्यानंतर आता नरेंद्र मोदी हे जवानामागे दडत असल्याचे सांगत पुलवामा येथे झालेल्या स्फोटाला जबाबदार कोण? अडीचशे किलो आरडीएक्स तिथपर्यंत आले कसे? याची उत्तरे आता भाजपानेच द्यायला हवीत. काँग्रेसच्या काळातही सर्जीकल स्ट्राईक झाले मात्र त्याचा आम्ही कधी गवगवा केला नसल्याचे सांगत सर्वाधिक दहशतवादी हल्ले मोदींच्याच काळात झाले. याबरोबर शेतकरी आत्महत्यांच्या घटनाही याच देवेंद्र आणि नरेंद्रच्या काळात झाल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. अशोकराव चव्हाण यांनी आपल्या भाषणात वाजेगावमधील वीटभट्ट्या आपण स्वत: पाठपुरावा करुन पुन्हा सुरू केल्याचे सांगितले. उद्योग बंद करुन येथील लोकांची रोजीरोटी हिसकावू नका, असेही ते म्हणाले.वंचित आघाडी स्पॉन्सर्डमहाराष्ट्रात दलित, अल्पसंख्याक, ओबीसी आपल्याला मते देणार नाहीत याची जाणीव भाजपाला झाली होती. त्यामुळे त्यांनीच मतविभाजन करण्यासाठी वंचित आघाडी स्पॉन्सर्ड केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. जागा वाटपासाठी चर्चा सुरू असताना दुसरीकडे उमेदवारी जाहीर होत होती. यावरुनच हे स्पष्ट होत असल्याचे सांगत वंचित आघाडीच्या नादी लागून स्वत:ची फसगत करु नका, तर भाजपाच्या पराभवासाठी काँग्रेस आघाडीला मते द्या, असे आवाहन पाटील यांनी केले.कै. शंकररावांमुळेच मिळाले या भागाला पाणीवाजेगाव कायम काँग्रेसच्या पाठीशी राहिले आहे. मी तुमच्याच गावचा असल्याचे सांगत शंकरराव मतदानासाठी धनेगावला यायचे, या आठवणींना उजाळा देत शंकररावांमुळेच या भागाला पाणी मिळाल्याचे अशोकराव चव्हाण यांनी सांगितले. नांदेडमधून काँग्रेसचा विजय पक्का असल्याची ग्वाही देत ७० टक्के मतदान भाजपाविरोधी असताना केवळ मतविभाजनामुळे मागीलवेळी त्यांची सत्ता आली होती. मात्र, यावेळी जनता भूलणार नाही. भाजपाला धडा शिकवेल, असे ते म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस