ग्रंथालयांच्या थकीत अनुदानाचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:14 IST2021-05-31T04:14:41+5:302021-05-31T04:14:41+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील व आमदार विक्रम काळे यांच्यासमवेत समन्वयिका रिताताई बाविस्कर, राज्य ग्रंथ निवड समितीचे ...

ग्रंथालयांच्या थकीत अनुदानाचा मार्ग मोकळा
राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील व आमदार विक्रम काळे यांच्यासमवेत समन्वयिका रिताताई बाविस्कर, राज्य ग्रंथ निवड समितीचे सदस्य संतोष दगडगावकर यांच्या शिष्टमंडळाने
राज्यातील ग्रंथालयांचे थकीत अनुदान वितरित करण्यासंदर्भात मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेऊन राज्यातील शासनमान्य ग्रंथालयाचे थकलेले अनुदान वितरित करण्यासंदर्भात निवेदन दिले होते. या कोरोना महामारीच्या काळात सुद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता राज्यातील ग्रंथालयाच्या बांधवांचे थकलेले अनुदान मिळवून देण्यासाठी व ग्रंथालय सेवकांचा रोजीरोटीचा प्रश्न मिटवण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांना राज्यातील ग्रंथालयाचे थकीत अनुदान त्वरित वितरित करण्यात यावे तसेच राज्यातील ग्रंथालयासमोर सद्यस्थितीत अनुदानाशिवाय कोणतीच आर्थिक उपलब्धता नाही. त्यामुळे ग्रंथालयांचे ग्रंथपाल, ग्रंथालय सेवक यांचे वेतन वेळेवर देण्यासाठी आणि त्यांची होणारी उपासमार टाळून त्यांची होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी ग्रंथालयाचे थकीत अनुदान आपण लवकरात लवकर अदा करावे. अशी पत्राद्वारे समक्ष भेटून मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेऊन २७ मे रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ग्रंथालय संचनालयाच्या संचालिका शालिनीताई इंगोले, प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता आणि संबंधित अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेऊन थकीत अनुदानासंदर्भात रीतसर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती दगडगावकर यांनी दिली.