राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पठाण यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:27 IST2021-02-23T04:27:20+5:302021-02-23T04:27:20+5:30

नूतन सरपंच, उपसरपंचांची बैठक देगलूर - हणेगाव येथील नूतन सरपंच व उपसरपंच यांची बैठक १८ रोजी सरपंच वैशाली पडकंठवार ...

Pathan felicitated by NCP | राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पठाण यांचा सत्कार

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पठाण यांचा सत्कार

नूतन सरपंच, उपसरपंचांची बैठक

देगलूर - हणेगाव येथील नूतन सरपंच व उपसरपंच यांची बैठक १८ रोजी सरपंच वैशाली पडकंठवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. पहिल्याच बैठकीत येडूर साठवण तलावातून पाणीपुरवठा प्रश्न मार्गी लावणे, जि. प. शाळेसाठी व पोलीस चौकीसाठी नवीन इमारत बांधकामासाठी निधी आणणे आदी ठराव घेण्यात आले, अशी माहिती सरपंच पडकंठवार यांनी दिली. याशिवाय बसस्थानक येथे प्रवासी निवाऱ्याची सोय करणे, जि. प. शाळेला सेवक मिळवून देणे आदीही ठराव घेण्यात आले.

विद्यार्थ्यांचा स्कॉलरशीप अकाऊंट मेळावा

माहूर - आष्टा येथील शंकरराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे पोस्ट खात्याच्यावतीने विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप अकाऊंट उघडण्यासाठी मेळावा घेण्यात आला. यावेळी मॅनेजर स्वप्नील सावंत, डाक निरीक्षक अभिनव सिन्हा व रोशन भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कर्मचारी किरण गीते, साई नरंगले, स्नेहा पुंड, शाहरूख पठाण, आतीश चव्हाण, अभिषेक जाधव, विनोद महाले, रोहित जाधव यांनी विद्यार्थ्यांचे खाते उघडले.

शिवजयंतीदिनी मास्कचे वाटप

उमरी - येथील रामनगर वस्तीत गटसाधन केंद्रातील पी. ए. नंदेश्वर यांच्यावतीने विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी एस. एल. बेळकोणे, एम. पी. पवार, पिराजी लिंबाळकर, भीमराव धोत्रे, शेख अकबर, विठ्ठल गाळे, तानाजी हंगीरगे उपस्थित होते. यावेळी नंदेश्वर यांच्याकडून मास्कचे वाटप करण्यात आले.

ग्राहक विक्री केंद्राचे उद्घाटन

बिलोली - कासराळी येथे शेतकरी ते ग्राहक विक्री केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्याहस्ते झाले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद कृषी अधीक्षक चलवदे, कृषी अधिकारी पसलवाड, सरपंच शेषराव लंके, उपसरपंच वसंतराव पाटील, गंगाराम भुरे, शुभम कनशेटे, कृषी सहायक एन. एम. इंगेवाड आदी उपस्थित होते.

यावेळी पपई, टरबूज आदी फळांची विक्री करण्यात आली.

बाजार समितीवर चार अशासकीय सदस्य

हिमायतनगर - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर चार अशासकीय समिती सदस्यांची निवड झाली आहे. यात दोन राष्ट्रवादी व दोन शिवसेनेच्या सदस्यांची निवड झाली. यामध्ये राष्ट्रवादीचे सुनील पतंगे, उदय देशपांडे, शिवसेनेचे विशाल राठोड, काशिनाथ सूर्यवंशी यांचा समावेश आहे. याबद्दल सभापती डॉ. प्रकाश वानखेडे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रामभाऊ ठाकरे, नगराध्यक्ष कुणाल राठोड, नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, प्रभाकर मुधोळकर, शरद चायल, सचिव नागोराव माने आदी उपस्थित होते.

मुगट येथील सराफी दुकानात चोरी

मुदखेड - मुगट (ता. मुदखेड) येथील सराफी दुकानातून ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोराने लंपास केले. हनुमान ज्वेलर्समध्ये ही घटना २० फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी संबंधित दुकान मालकाने चोरीची तक्रार मुदखेड पोलिसात दिली. पोलीस तपास करीत आहेत.

मुख्याधिकारी म्हणून ज्ञानेश्वर ठोंबरे रूजू

धर्माबाद - येथील पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. यपूर्वी ते कुंडलवाडी येथे कार्यरत होते. प्रभारी कारभार तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांच्याकडे होता. दरम्यान, ठोंबरे यांचे उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी, नगराध्यक्षा अफजल बेगम यांचे पती अब्दुल सत्तार, भाजपचे संजय पवार, राजू सुरकुटवार आदींनी स्वागत केले.

Web Title: Pathan felicitated by NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.