अर्धवट जळलेला मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:13 IST2021-01-10T04:13:57+5:302021-01-10T04:13:57+5:30
नांदेड - बिलोली तालुक्यातील खतगाव शिवारात अर्धवट जळलेला मृतदेह आढळला असून, ही घटना ८ जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आली. ...

अर्धवट जळलेला मृतदेह सापडला
नांदेड - बिलोली तालुक्यातील खतगाव शिवारात अर्धवट जळलेला मृतदेह आढळला असून, ही घटना ८ जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आली. खतगावहून नवीन थडी सावरगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या पूर्वेकडील बाजूला नवीन पेट्रोल पंपाजवळ मोकळ्या जागेत अंदाजे ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा अर्धवट जळलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. शुक्रवारी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना हा अर्धवट जळलेला मृतदेह दिसला. त्यांनी याची माहिती खतगाव येथील गोविंद पाटील यांना दिली. त्यानंतर पाटील यांनी रामतीर्थ पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक माधव पुरी, बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ही घटना घातपातातून झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पेट्रोल टाकून या व्यक्तीला मारण्यात आले असावे, असेही पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.