बर्ड फ्लूची परभणीत एंट्री; नांदेडात सावधगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:43 IST2021-01-13T04:43:30+5:302021-01-13T04:43:30+5:30
हिमायतनगर येथील मृत कोंबड्या आणि मधमाशांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथे पाठविण्यात आले आहेत. बर्ड फ्लूचा धोका हा केवळ कोंबड्यांना ...

बर्ड फ्लूची परभणीत एंट्री; नांदेडात सावधगिरी
हिमायतनगर येथील मृत कोंबड्या आणि मधमाशांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथे पाठविण्यात आले आहेत. बर्ड फ्लूचा धोका हा केवळ कोंबड्यांना नसून इतर अनेक पक्ष्यांमध्येही संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा विषाणू आणखी किती पसरेल याबाबत साशंकता आहे. नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर तालुक्यातील चिंचोर्डी येथे गेल्या आठ दिवसांत अज्ञात आजाराने शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे, तसेच रुक्मिणीनगर भागात मधमाशाही मृत्यूमुखी पडल्याचे आढळून आले. त्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. उस्मानाबाद, लातूर आणि परभणीपाठोपाठ आता नांदेडातही कोंबड्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे प्रशासनाने सज्जतेच्या सूचना दिल्या आहेत.
चौकट- नांदेड जिल्ह्यात अद्यापतरी बर्ड फ्लूचा धोका नसला तरी, तालुका आणि ग्रामीणस्तरावरील पोल्ट्री फार्मची संख्या, त्यातील कोंबड्या यासह इतर पशू-पक्ष्यांची माहिती, त्यांना असलेले आजार याची माहिती गोळा करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांचा समावेश असलेली ३२ पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांनी तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने दिल्या आहेत.